सॅन फ्रान्सिस्को, 15 मे : कोरोनामुळं सध्या जगातली सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं लोकांना घरातूनच काम करावं लागत आहे. यासाठी सध्या लोकं ऑनलाईन अॅपचा वापर करून नवीन कोर्स किंवा आपलं काम करतात. मात्र अशाच एका अॅपवरून विचित्र प्रकार घडला. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को शहरात ऑनलाईन बायबल वर्ग सुरू असताना एक अश्लील व्हिडीओ सुरू झाला.
येथील एका चर्चच्या वतीनं खास लॉकडाऊन बायबल क्लासचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा क्लास सुरू असतानाच ऑनलाईन व्हिडीओ कॉलमध्ये पॉर्न सुरू झालं. त्यामुऴं अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता या चर्चच्या वतीनं कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा-गर्लफ्रेंण्डसोबत बेटावर अकडला दिग्गज खेळाडू, ब्लॅकमेलरच्या हाती लागला SEX VIDEO
कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को शहरातील सर्वात जुन्या सेंट पॉलच्या लूथरन चर्चने Zoom व्हिडीओ चॅटद्वारे ऑनलाइन बायबलचा वर्ग आयोजित केला होता. दरम्यान सहभागी लोकं बायबलचे पठण करत असताना अचानक स्क्रीनवर पॉर्न चालू झाले. दरम्यान या क्लासमध्ये लहान मुलंही असल्यामुळं चर्चमधील वरिष्ठांनी Zoom वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाचा-भर दुकानात महिलेनं केलं हस्तमैथून, VIDEO व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई
#computerhacking | #computer | #Hacking | US church sues Zoom after Bible study ‘zoombombed’ by child abuse https://t.co/NydTxLiAfw
— National Cyber Security (@NCSVenturrs) May 14, 2020
वाचा-Coronavirus : 'हस्तमैथुन करा', अमेरिकेत सरकारने नागरिकांना दिला सल्ला
त्यानंतर सेंट पॉलच्या लुथेरन चर्चच्या वतीनं फेडरल कोर्टात गोपनीयतेचं उल्लंघन, धार्मिक कार्यात अडथळा यासह विविध कलमांतर्गत Zoom व्हिडीओ अॅडमिनिस्टेटर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चर्च प्रशासकाने सांगितले की बायबल वर्गाच्या वेळी मोठ्या संख्येने वृद्ध लोक ऑनलाइन होते. दरम्यान झूम कंपनीच्या प्रवक्त्यांनी एका हॅकरनं तो वर्ग हॅक केला होता आणि त्यामध्ये अश्लील व्हिडिओ प्ले केला होता, असे सांगितले . तसेच त्या हॅकरची माहिती संबंधित कायदेशीर एजन्सीना देण्यात आली आहे.
वाचा-सावधान! आता SEX ही सुरक्षित नाही?, शास्त्रज्ञांना स्पर्ममध्ये सापडला कोरोना
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील देशांमध्ये झूम अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. या माध्यमातून लोक ऑफिसची काम तसेच विविध कोर्सही आयोजित करतात. परंतु सुरक्षा वैशिष्ट्यांच्या अभावामुळे झूम विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.