घड्याळ, बेल्ट आणि शर्टची बटणंही ओळखू शकणार कोरोनाची लक्षणं!

घड्याळ, बेल्ट आणि शर्टची बटणंही ओळखू शकणार कोरोनाची लक्षणं!

शरिराचं तापमान, ऑक्सिजनचं प्रमाण, पल्स रेट, श्वसनाची गती, कफ, सर्दी, खोकला, अशा कोरोनाच्या सगळ्या लक्षणाविषयी हे सेंसर्स माहिती देणार आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क 10 मे: कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून जूनमध्ये आणखी उद्रेक होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी अमेरिकेतल्या अनेक दिग्गज कंपन्या सरसावल्या आहेत. तर अमेरिकन लष्करानेही तयारी सुरू केली असून कोरोनाची लक्षणं लगेच ओळखणारी सेंसर्स तयार करण्यासाठी अमेरिकेन लष्कराने पुढाकार घेतला आहे. CNNने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

घड्याळ, बेल्ट, शर्टची बटणं किंवा तुमच्या गॉगलला जर अशा प्रकरची सेंसर्स असतील तर ते काही मिनिटांमध्ये तुम्हाला लक्षणं आहेत का ते शोधतील आणि तुम्हाला सूचना देतील. त्यामुळे तातडीने उपचार करणं सोईचं होणार आहे. त्यासाठी अमेरिकन लष्कराने अनेक टेक कंपन्यांना संपर्क केला असून 25 मिलियन डॉलरचा ते करारही करणार आहेत.

शरिराचं तापमान, ऑक्सिजनचं प्रमाण, पल्स रेट, श्वसनाची गती, कफ, सर्दी, खोकला, अशा कोरोनाच्या सगळ्या लक्षणाविषयी हे सेंसर्स माहिती देणार आहेत. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात कोरोनावर उपचार करणं सुरू करता येणार आहे. यात यश मिळालं तर ते कोरोनाविरुद्धच्या टप्प्यात खूप मोठं योगदान ठरणार आहे.

आई-बाप होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आलेलं दाम्पत्य, लेकीसह मायदेशी परतले पण...

आता कोरोना संशयित व्यक्तीलाच घरच्या घरी कोरोना टेस्ट करता येणं शक्य आहे. तेदेखील फक्त लाळेचं नमुने घेऊन.

सध्या तरी लाळेमार्फत कोरोना टेस्टला (Saliva corona test) अमेरिकेत (america) मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (America FDA) मंजुरी दिली आहे.

हे वाचा - देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

रुटगर्स युनिव्हर्सिटीच्या आययूसीडीआर इनफाइनाइट बायोलॉजिक्स लॅब आणि स्पेक्ट्रम सॉल्युसंस आणि अॅक्युरेट डायग्नोस्टिक्सने एकत्रितरित्या ही कोरोना टेस्ट तयार केली आहे. गेल्या महिन्यात एफडीएनं रुटगर्सला कोरोना संक्रमितांच्या लाळेचे नमुने जमा करण्याची परवानगी दिली होती. आता रुटगर्सचा हे किट घरच्या घरी वापरता येईल अशी कलेक्शन किट (Collection Kit) म्हणून विकण्यास मंजुरी दिली आहे. रुटगर्सने सांगितलं या टेस्टसाठी 100 डॉलर्स घेतले जातील. आरयूसीडीआरचे सीईओ डॉ. अँड्र ब्रुक्स यांनी सांगितलं, याचा वापर करणं खूपच सोपं आहे.

 

 

First published: May 10, 2020, 4:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading