सीरियावर अमेरिकेचे हल्ले, रशिया देणार जशास तसं उत्तर!

सीरियावर अमेरिकेचे हल्ले, रशिया देणार जशास तसं उत्तर!

या हल्ल्यात ब्रिटन आणि फ्रान्सचाही सहभाग असल्याचा दावा पेंटॅगॉनने केला असून दोन्ही देशांनी त्याला दुजोरा दिला आहे.

  • Share this:

दमास्कस,ता.१४ एप्रिल : अमेरिकेनं सीरियावर अखेर हवाई हल्ल्यांना सुरवात केलीय. त्यामुळं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले धमकी खरी ठरलीय. मागच्या आठवड्यात सीरियानं डुमा शहरात केलेल्या रासायनिक हल्ल्याला हे प्रत्युत्तर समजलं जातंय.

दोनच दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांना पाठिंबा देणाऱ्या रशियावर जोरदार टीका केली होती. यापुढे हल्ले केले तर खबरदार अशी धमकीच त्यांनी दिली होती. ट्रम्प यांनी आज देशाला संबोधित केलं आणि अमेरिकन लष्कराला सीरियावर हल्ल्याचे आदेश दिल्याचं जाहीर केलं.

या हल्ल्यात ब्रिटन आणि फ्रान्सचाही सहभाग असल्याचा दावा पेंटॅगॉनने केला असून दोन्ही देशांनी त्याला दुजोरा दिला आहे. सीरियातल्या तीन ठिकाणांवर अमेरिकेनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

राजधानी दमास्कस मधलं केमिकल रिसर्च सेंटर आणि होम्स शहरातल्या दोन लष्करी तळांवर हे हल्ले करण्यात आले. या सर्व ठिकाणी रासायनिक शस्त्रांवर संशोधन, त्याची निर्मिती आणि साठवणूक केली जाते असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

हे हल्ले फक्त रासायनिक शस्त्रांना नष्ट करण्यासाठी केले असल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. सत्ता बदलासठी हे हल्ले नाहीत असं ब्रिटन आणि फ्रान्सनेही स्पष्ट केलंय. तर या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सीरियानं म्हटलं आहे.

रशियाची धमकी

अमेरिकेचे हल्ले हे सीरियावरचं आक्रमण आणि रशियाचा अपमान आहे. या हल्ल्याला रशिया सडेतोड उत्तर देईल अशी तीव्र प्रतिक्रीया रशियानं व्यक्त केलीय. त्यामुळं सीरिया आता आणखी मोठ्या युध्दाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

First published: April 14, 2018, 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading