जगातील सर्वात मोठ्या अमेरिकास्थित बियर कंपनीत बेछुट गोळीबार, अनेकांचा मृत्यू

जगातील सर्वात मोठ्या अमेरिकास्थित बियर कंपनीत बेछुट गोळीबार, अनेकांचा मृत्यू

हल्लेखोराने हल्ला केला तेव्हा यूनिटमध्ये तब्बल 600 कर्मचारी काम करीत होते

  • Share this:

मेवॉकी, 27 फेब्रुवारी : अमेरिकेतील विस्कोन्सिन भागात बुधवारी बियर बनविणाऱ्या कंपनीत बेछुट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोळीबार करणाऱ्या या हल्लेखोराने यूनिटमध्ये घुसून बेछुट गोळीबार केला. ही घटना मेवॉकी शहरात जगातील सर्वात मोठ्या बियर कंपनीपैकी एक मोलसन कूर्सच्या कॅम्पसमध्ये घडली. मेवॉकीच्या महापौरांनी दावा केला आहे, की ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असू शकते. महापौरांनी सांगितल्यानुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी एक बंदूकधारी व्यक्ती मोलसन कुर्सच्या कॅम्पसमध्ये शिरला आणि तेथे त्याने अंधाधुन गोळीबार सुरू केला. कॅम्पसमध्ये उपस्थित सुरक्षा रक्षकांनी सांगितले की जोपर्यंत त्याला मारण्यात आले होते तोपर्यंत त्या व्यक्तीने अनेकांवर गोळीबार केला होता.

शहराचे मेयर टॉम बेरेट यांनी सांगितले की, बंदुकधारी ज्या प्रमाणे कॅम्पसमध्ये उपस्थित लोकांना आपला निशाणा बनवत होता, ते अत्यंत भयावह होते. या घटनेत हल्लेखोरही मारला गेला आहे आणि अनेकांचा या गोळीबारात दुर्देवी मृत्यू झाला.

हल्ल्याच्या वेळी युनिटमध्ये 600 लोक करीत होते काम

हल्लेखोराने ज्या वेळी कॅम्पसच्या आत शिरुन गोळबार सुरू केला त्यावेळी कंपनीत 600 कर्मचारी काम करीत होते. गोळ्यांचा आवाज ऐकून तेथे आत असलेले लोक बाहेर आले यामुळे जास्त नुकसान झाले. मेवॉकीमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या जागेला मिलर वॅली यानावाने ओळखले जाते. आतापर्यंत या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

First published: February 27, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या