मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, दोषींविरोधात कारवाई करण्याची भारताची मागणी

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, दोषींविरोधात कारवाई करण्याची भारताची मागणी

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये (California) एका उद्यानातील महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये (California) एका उद्यानातील महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये (California) एका उद्यानातील महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे

कॅलिफोर्निया, 30 जानेवारी: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये (California) एका उद्यानातील महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी हे कृत्य केलं असून मोठ्या प्रमाणात या पुतळ्याचे (Statue) नुकसान केलं आहे. यामुळे भारतीय नागरिकांसह अमेरिकन नागरिकांसाठी देखील ही खूप मोठी घटना असून याचा तपास करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उत्तर कॅलिफोर्नियाच्या डेव्हिस सिटीतील सेंट्रल पार्कमधील महात्मा गांधीजींचा हा 6 फूट उंच आणि 294 किलो वजनाचा कांस्य पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक डेव्हिस इंटरप्राइस मध्ये आलेल्या वृत्तानुसार, या पुतळ्याचा अर्धा चेहरा आणि पावले गायब असल्याचं आढळून आलं आहे.

वाशिंग्टन डी. सी. मधील भारताच्या दूतावासाने या प्रकरणी गंभीर चौकशी आणि तपास केला जावा अशी मागणी केली आहे. शिवाय या अत्यंत नींदनीय कामासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी केली जात आहे. सॅन फ्रांसिस्कोमध्ये देखील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने डेव्हिस शहर आणि स्थानिक कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला आहे, ज्यावर तपास सुरू आहे.

(हे वाचा-Fact Check : पोलार्डच्या गाडीला खरंच भीषण अपघात झाला? जाणून घ्या सत्य)

डेव्हिस सिटीचे काउंसिलमन लुकास फ्रीरिक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुटलेल्या अवस्थेतील हा पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला असून 27 जानेवारीच्या सकाळी पार्कमधील कर्मचाऱ्याला तुटलेल्या अवस्थेतील हा पुतळा दिसून आला होता. सॅक्रॅमेन्टो बिने दिलेल्या वृत्तानुसार पुतळ्याची तोडफोड करण्यामागील कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. डेव्हीसमधील स्थानिक नागरिकांच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याची झालेली तोडफोड आम्ही अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे डेव्हिस पोलिस विभागाचे डेप्युटी चीफ पॉल डोरोशोव्ह यांनी म्हटले आहे. 2016 मध्ये भारत सरकारने डेव्हिस शहराला गांधीजींचा हा पुतळा भेट म्हणून दिला होता.

या घटनेवर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल (FISI) चे गुरंग देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना, ओएफएमआय, खालिस्तानी फुटीरतावादी संघटना आणि हिंदुत्वविरोधी कट्टरपंथी संघटनांकडून द्वेषाचे वातावरण निर्माण केलं जात असल्याचे म्हटले. या संघटनांना केवळ भारताविरोधी द्वेष निर्माण करायचा असून कॅलिफोर्नियामधील शाळातील पुस्तकांमधून भारताचे नाव काढून काढून टाकणे हेच त्यांचे एकमेव उद्धिष्ट असल्याचे म्हटले आहे. या घटनेचं गांभीर्य पाहून हिंदु अमेरिकन फाउंडेशनने या घटनेचा होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (DHS) आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) यांनी तपास करण्याची मागणी केली आहे.

(हे वाचा-शिवसैनिकाचा धक्कादायक व्हिडिओ, बंदुकीचा धाक दाखवून ओव्हरटेक, निलेश राणे म्हणतात..)

कॅलिफोर्नियामधील हिंदू अमेरिकी फाउंडेशनचे (HAF) अ‍ॅडव्होकेसी डायरेक्टर इसन कॅटर यांनी या प्रकरणाची होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (DHS) आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) यांनी तपास करण्याची मागणी केली आहे. आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून भारतीय अमेरिकन समुदायाला धमकावण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे या घटनेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.  महत्त्वाचे म्हणजे खलिस्तानी समर्थकांनी कॅलिफोर्नियामधील या घटनेचे ट्विटरवरून समर्थन केलं असून आजचा दिवस चांगला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही.  दिल्लीत शेतकरी आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला होता.

First published:

Tags: Mahatma gandhi