कोरोनानंतर आता चिमुरड्यांना अज्ञात आजाराचा विळखा, 3 मुलांचा मृत्यू

कोरोनानंतर आता चिमुरड्यांना अज्ञात आजाराचा विळखा, 3 मुलांचा मृत्यू

अमेरिकेत शंभरपेक्षा अधिक लहान मुलांना या अज्ञात आजाराची (unknown disease in children) लागण झाली आहे. तर युरोपीयन देशातही या आजाराचे रुग्ण आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 11 मे :  5 महिन्यांपासून जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसलाच (coronavirus) अद्याप पूर्णपणे ओळखता आलं नाही, त्याचा अभ्यास अद्यापही सुरूच आहे. काही लहान मुलांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं समोर आलीत, त्यात आता कोरोनानंतर एका अज्ञात आजारानंही या चिमुरड्यांना (child disease) विळखा घातला आहे. अमेरिकेत शंभरपेक्षा अधिक लहान मुलांना या अज्ञात आजाराची लागण झाली आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. फक्त न्यूयॉर्क शहरातच 73 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.

सुरुवातीला हा आजार कोरोनासंबंधित असल्याचं मानलं जात होतं. मात्र न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू क्योमो यांनी सांगितलं की, "या अज्ञात आजारानं ग्रस्त असलेल्या बहुतेक मुलांना श्वसनसंबंधी समस्या असल्याची लक्षणं नाहीत". न्यूयॉर्क जीनोम सेंटर आणि रॉकफेलर युनिव्हर्सिटी एकत्रितरित्या या आजाराचं कारण शोधण्याचं प्रयत्न करत आहेत.

हे वाचा - लक्षणं नाहीत तरी 7 टेस्ट पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या डिस्चार्ज नियमांवर प्रश्न

दरम्यान स्थानिक प्रसारमाध्यमं या आजारामुळे 10 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला आहे, असा दावा करत आहेत. त्यामुळे या आजाराची किती प्रकरणं आहेत आणि किती मृत्यू झालेत याची तपासणी न्यूयॉर्कचं आरोग्य विभाग करत आहे.

काय आहेत या अज्ञात आजाराची लक्षणं?

मिळालेल्या माहितीनुसार ज्या मुलांना हा आजार झाला आहे, ते 2 ते 15 वयोगटातील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्वचा आणि नसांना सूज ही सुरुवातीची लक्षणं आहेत. मुलांच्या डोळ्यांमध्ये जळजळ जाणवते, शरीरावर लाल चट्टे येतात. शिवाय त्वचेचा रंगही बदलोत. तसंच भरपूर दिवस ताप, पोट आणि छातीत गंभीर वेदना, ब्लड प्रेशर कमी होणं अशा समस्याही दिसून येतात.

हे वाचा - ‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची कोरोनाग्रस्त चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू

जोपर्यंत या आजाराचं कारण समजत नाही, तोपर्यंत त्यावर उपचार करणंही अशक्य असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. सध्या स्टेरॉइड, इन्ट्रावेनस, इम्युनोग्लोबुलिन आणि अॅस्पिरीन अशी औषधं आणि कठीण परिस्थितीत अँटिबायोटिक्स या रुग्णांना दिली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर आणि अति गंभीर रुग्णांना वेंटिलेटरवर ठेवावं लागत आहे.

जगभरात अशीच प्रकरणं

फक्त अमेरिकाच नव्हे, फक्त अमेरिकाच नव्हे तर ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडमध्येही 50 पेक्षा जास्त मुलांना याची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मारिया वॅन केरखोवे यांनी सांगितलं की, युरोपील देशांमध्ये आढळून आलेल्या या आजाराची लक्षणं लहान मुलांना होणाऱ्या कावासाकी आजाराच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. लहान मुलांवर या आजाराचा परिणाम जास्त होतो आहे कारण त्यांच्यामध्ये त्याविरोधात रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नाही, असं सुरुवातीला दिसून आलं आहे. या आजाराची माहिती मिळवण्यासाठी सध्या जेनेटिक टेस्ट केल्या जात आहेत.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - तुमच्याजवळील वस्तू 'या' ड्रॉवरमध्ये टाका आणि व्हायरसमुक्त करा

First published: May 11, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading