लंडन, 30 सप्टेंबर: कोरोना काळात (Job loss during Corona period) अनेकांना आपली नोकरी गमावली लागली आहे. तुमचीही नोकरी (searching for new job) गेली असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. त्यातही तुम्ही पिझ्झाप्रेमी (pizza lover) असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. आता तुम्ही म्हणाल पिझ्झा आवडण्याचा आणि नोकरीचा काय संबंध?
पिझ्झा ही अशी डिश आहे जी क्वचितच कोणाला आवडत नसेल. लोक स्वादिष्ट टॉपिंगसह पिझ्झा खाण्यासाठी कितीही पैसे खर्च करतात. पण कल्पना करा, जर तुम्हाला ही स्वादिष्ट डिश खाण्यासाठी लाखो रुपयांची ऑफर दिली गेली तर? तुम्ही याला विनोद समजाल. पण हे खरं आहे. युनायटेड किंग्डममध्ये (United Kingdom) मोफत पिझ्झा खाण्याची आणि त्या बदल्यात लाखो रुपये कमवण्याची संधी उपलब्ध आहे.
पिझ्झा तयार करणारा आघाडीचा ब्रँड पिझ्झा हट (Pizza Hut New Offer) ही ऑफर देत आहे. पिझ्झा हटकडून ‘पिझ्झा सुपर टेस्टरच्या पदा’साठी (Pizza Super Tasters) अर्ज मागवण्यात आले आहेत. या पिझ्झा सुपर टेस्टरला कंपनीने नवीनच बनवलेला स्टफ्ड क्रस्ट पिझ्झा खावा लागेल आणि पिझ्झा कसा आहे ते सांगावं लागेल. या नोकरीत एका रिव्ह्यूसाठी तब्बल 5 लाख रुपये दिले जातील. मात्र, ही नोकरी मिळण्याआधी तुम्ही पिझ्झाचे सुपर टेस्टर आहात हे सिद्ध करावं लागेल. पिझ्झा हटने स्टफ्ड क्रस्ट पिझ्झामध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे यूकेमधील सर्वोत्तम पिझ्झा टेस्टरना या पिझ्झाचं मूल्यमापन करण्यासाठी कंपनीने आमंत्रित केलं आहे.
हे वाचा-जमिनीखाली न्यूक्लियर बंकरमध्ये आहे आलिशान सुविधांचं पर्यटनस्थळ पाहा PHOTOS
पिझ्झा हटने चिजी गार्लिक बटर स्टफ्ड क्रस्ट, मीटी पेपरॉनी अँड चीज स्टफ्ड क्रस्ट पिझ्झाच्या चाचणीसाठी ही नोकरी देऊ केली आहे. याबाबत पिझ्झा हट यूके आणि युरोपच्या चीफ ब्रँड ऑफिसर अमेलिया रिबा यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचं आमचं ध्येय आहे. म्हणूनच आम्ही मुख्य क्रस्ट टेस्टरची नियुक्ती करत आहोत. सर्व स्टफ्ड क्रस्ट पिझ्झाची चव आणि चाचणी घेतल्यानंतरच लोकांना दिले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण यूकेमधून पिझ्झाप्रेमींना चवदार पिझ्झा चाखण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे.
पिझ्झा कसा दिसतो, त्याचे टॉपिंग्ज किती चवदार असतात आणि क्रस्ट किती मऊ आणि खुसखुशीत आहे, हे टेस्टर सांगतील. 5 लाख रुपये दिले जाणाऱ्या या मनोरंजक नोकरीसाठी पिझ्झा हट येथे मुख्य क्रस्ट टेस्टरचे अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यांना पिझ्झाच्या नवीन स्वादांबद्दल आपलं मत व्यक्त करावं लागेल.
हे वाचा-TIKTOK खरेदी करण्यासाठी ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टवर आणला होता दबाव - नडेला
असे हटके आणि जास्त मेहनत नसलेले जॉब इथं याआधी दिले गेले आहेत. युकेमधील एका फार्मिंग कंपनीने काही दिवसांपूर्वी भाजीपाला तोडण्यासाठी मोठ्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली होती. वर्षभर कोबी आणि ब्रोकोली तोडण्यासाठी कंपनीकडून तब्बल 63 लाखांचं पॅकेज दिलं जात होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pizza