मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

क्वारंटाईन असताना केस कापणं पडलं महागात, बसला इतक्या लाखांचा दंड

क्वारंटाईन असताना केस कापणं पडलं महागात, बसला इतक्या लाखांचा दंड

बापरे! केस कापायला सलूनमध्ये गेला आणि बसला लाखोंचा फटका, किंमत वाचून व्हाल थक्क.

बापरे! केस कापायला सलूनमध्ये गेला आणि बसला लाखोंचा फटका, किंमत वाचून व्हाल थक्क.

बापरे! केस कापायला सलूनमध्ये गेला आणि बसला लाखोंचा फटका, किंमत वाचून व्हाल थक्क.

    लंडन, 23 जुलै : सध्या कोरोनामुळे सारं जग ठप्प झालं आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच कैद राहावं लागत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही मंडळींना घराबाहेर पडण्याचा मोह आवरत नाही, अशांसाठी प्रशासनाला निमय कडक करावे लागतात. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये घडला. येथील सेल्फ आयसोलेशनमध्ये असलेल्या एका व्यक्तीला त्याची एक चूक चांगलीच महागात पडली. क्वारंटाइनमध्ये हा माणूस केस कापायला सलूनमध्ये गेला, नियम मोडल्याप्रकरणी त्याला चक्क 7600 डॉलरचा दंड बसला रिपोर्टनुसार, दोन आठवड्यांसाठी या व्यक्तीला सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. सेल्फ आयसोलेशनमध्ये घरातून बाहेर पडणे आणि इतरांना भेटण्यास मनाई असते. रिपोर्टनुसार, 3 जुलै रोजी गॅरेथ ले मॉनिअर नामक इसमानं आपल्या पत्नीसमवेत ग्वेर्नसे बेटावर फिरायला गेला. या 37 वर्षीय व्यक्तीला क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र सेल्फ आयसोलेशनचा कालावधी संपण्याआधी हा गॅरेथ केस कापायला गेला. त्यानंतर गॅरेथ विरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याच्याविरुद्ध कोर्टात साक्षीदारही होते. या सगळ्यात गॅरेथला भारतीय रुपयानुसार तब्बल 5 लाख 67 हजार 533 रुपयांचा दंड भरावा लागला. वाचा-विनामास्क फिरणाऱ्यांना पत्रकारानं असा शिकवला धडा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू वाचा-कडक सॅल्यूट! त्याचा 'काळ' आला होता पण पुणे पोलिसांनी येऊ दिली नाही 'वेळ' जेव्हा बॉर्डर एजिन्सीने त्याची चौकशी केली. तेव्हा त्यानं घरातच असल्याचे खोटं सांगितले. यानंतर तपासादरम्यान सेल्फ आयसोलेशनमध्ये असताना या व्यक्तीने नियम मोडल्याचे निष्पण्ण झाले. हे प्रकरण न्यायालयात पोहचले. जेथे गॅरेथ विरोधात न्यायालयाने निर्णय दिला. या प्रकरणी न्यायाधिशांनी 3800 डॉलरचा दंड ठोठावला आहे. वाचा-समुद्र किनाऱ्यावर खेळत होता चिमुरडा मागून आला शिकारी शार्क आणि...
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या