धक्कादायक... युनाएटेड एअरलाइन्सनं प्रवाशाला फरफटत विमानातून काढलं बाहेर!

धक्कादायक... युनाएटेड एअरलाइन्सनं प्रवाशाला फरफटत विमानातून काढलं बाहेर!

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलान्सने प्रवाशांची फक्त माफी मागितली आहे.या घटनेचा जगभरातून युनायटेड एअरलाईन्सच्या वर्तनाचा निषेध केला जातोय.

  • Share this:

12 एप्रिल : अमेरिकेतल्या युनायटेड एअरलाइन्सने एका प्रवाशाला फरफटत बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्यानं प्रवाशा बाहेर काढावं लागलं असा एअर लाईनचा दावा आहे.  पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलान्सने प्रवाशांची फक्त माफी मागितली आहे.या घटनेचा जगभरातून युनायटेड एअरलाईन्सच्या वर्तनाचा निषेध केला जातोय.

शिकागोच्या ओ हेअर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण क्र. ३४११ च्या विमानात हा प्रकार घडला. विमान शिकागोहून लुइसविले येथे जात होते. यात एअरलाइन्सच्या स्टाफच्या 4 कर्मचाऱ्यांनाही पाठवायचं होतं. पण विमानात एकही जागा रिकामी नव्हती. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या प्रवास करावा, अशी विनंती एअर लाईनने केली. जे प्रवासी खाली उतरतील त्यांना हॉटेल मुक्कामासाठी 400 डॉलर्स आणि नुकसान भरपाईचे 800 डॉलर देण्यास कंपनी तयार होती. पण कंपनीच्या आवाहनाला कुणीही प्रतिसाद दिला नाही.

अखेर कंपनीनं काही जणांना विमानातून बाहेर काढण्याची यादी काढली. त्यात व्हिडिओत दिसणाऱ्या प्रवाशाचं नावं होतं. मी डॉक्टर आहे, उद्या केंटूकीमध्ये काही रुग्ण माझी वाट बघत आहेत. त्यामुळे मला प्रवास करू द्यावा, असं प्रवाशांनं सांगितलं. पण एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी त्याची विनंती धुडकावून त्याला फरफटत बाहेर काढलं.

अन्य प्रवाशांनी हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर टाकलानंतर एअरलान्सने प्रवाशांची फक्त माफी मागितली आहे. तसंचं, प्रवाशाला जबरदस्तीने उतरविणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन करुन त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, युनायटेडज एअरलाईन्सला प्रवाशांशी केलेली वर्तणूक महागात पडली आहे...कंपनीच्या समभारांवर मोठा परिणाम झाला असून एक बिलियन डाॅलर्सचा कंपनीला फटका बसलाय...

First published: April 12, 2017, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading