पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक नागरिकांना त्रास देण्यासाठी ईशनिंदा कायद्याचा वापर केला जातो. ईशनिंदा हा पाकिस्ताानात सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. हुकूमशहा जिया-उल-हक यांच्या कालखंडात पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा कायदा लागू करण्यात आला होता. पाकिस्तान दंडविधान कायद्यामधील कलम 295-बी आणि 295-सी एकत्र करून हा ईशनिंदेचा कायदा तयार करण्यात आला होता. परंतु खरेतर हा कायदा पाकिस्तानला ब्रिटिश सरकारकडून वारसाहक्काने मिळाला आहे. 1860 मध्ये ब्रिटिश सरकारने या कायद्याची निर्मिती केली होती. त्यानंतर पुढे पाकिस्तान सरकारने ईशनिंदा कायदा म्हणून लागू केला. मानवाधिकार संस्था मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीसच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी 1 हजार ख्रिश्चन आणि हिंदू महिला आणि मुलींचं अपहरण केलं जातं. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांचा जबरदस्ती मुस्लिम व्यक्तीशी निकाह केला जातो. साधारणपणे 12 ते 25 या वयोगटातील मुलींचं अपहरण केलं जातं. त्यामुळे तरुण मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण जास्त आहे. संयुक्त राष्ट्र समर्थित NGO यूएन वॉच ही एक संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असणारी एनजीओ आहे. अमेरिकन ज्यु समिती ही एनजीओ चालवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला विशेष सल्ला देणारी मान्यताप्राप्त ही एनजीओ आहे. ही एनजीओ डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि डारफुरमध्ये मानवाधिकारांच्या हक्काचे उल्लंघन होत असल्यास त्यांना सहकार्य करण्याचे कार्य करते. त्याचबरोबर चीन, क्यूबा, रशिया आणि व्हेनेझुएलामध्येदेखील मानवाधिकार हक्कांचं उल्लंघन होत असल्यास त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम ही संस्था करते.Your presence on the U.N. Human Rights Council is intolerable. https://t.co/rVhyS3qHVS
— UN Watch (@UNWatch) November 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.