लंडन, 14 फेब्रुवारी : कोट्यवधींचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये ऐशोआरामात राहात असलेल्या विजय माल्ल्याने आता मात्र हात जोडले आहे. विजय माल्ल्याने पुन्हा एकदा म्हटले आहे की, भारतीय बॅंकांना कर्जाची मूळ रक्कम परत देण्यास तयार आहेत. गुरुवारी, भारताला प्रत्यार्पणाच्या विरोधात त्याने केलेल्या याचिकेच्या शेवटच्या दिवशीच्या सुनावणीत माल्ल्या म्हणाला की, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय माझ्यासोबत जे काही करत आहे, ते अन्यायकारक आहे.
माल्ल्या म्हणाल्या, "भारतीय बँकांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी कर्जाची मूळ रक्कम 100% त्वरित परत घ्यावी." मद्य व्यावसायिका विजय माल्ल्या यांच्या भारत प्रत्यार्पणाविरूद्ध केलेल्या अपीलावरील सुनावणीच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी रॉयल कोर्ट ऑफ जस्टिस्ट पोहोचले होते.
माल्ल्यावर 9000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
माल्ल्या (64) हा भारतातील 9000 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आणि पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात आरोपी आहेत. बँकांकडून घेतलेले कर्ज त्याने परत केले नाही. मल्ल्या यांनी कोर्टात प्रवेश करताना सांगितले की, त्याला बरं वाटतं आहे. देशातील विविध बॅंकांना चूना लावून विजय माल्ल्याने मार्च 2016 मध्ये लंडन येथे पलायन केले होते. विजय माल्ल्या याला परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय तपास संस्था प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही. स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांनी लंडनमधील एका न्यायालयात विजय मल्ल्या याच्या मालमत्ता जप्त करणे आणि दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली होती. विजय मल्ल्या भारतीय बँकांकडून नऊ हजार करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे घेऊन ब्रिटेन येथे पळ काढला. बँकांनी 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. माल्ल्या याने बँकेकडून कर्ज हे किंगफिंशर एअरलाइन्ससाठी घेतले होते. माल्ल्याने बँकांचे कर्ज बुडवत 2016 मध्ये भारत सोडून पळ काढला होता.