Home /News /videsh /

33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! पहिल्यांदाच समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO

33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! पहिल्यांदाच समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO

इराकची राजधानी तेहरानमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच 180 प्रवाशी असलेल्या युक्रेनच्या विमानाला अपघात झाला होता.

    तेहरान, 09 जानेवारी : इराकची राजधानी तेहरानमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच 180 प्रवाशी असलेल्या युक्रेनच्या विमानाला अपघात झाला होता. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आता या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये युक्रेनचे बोइंग 737 हे विमान हवेत उडताच खाली पडताना दिसत आहे. प्रेस टीव्हीच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या 33 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये या विमानाचे हवेतच तुकडे झाल्याचे दिसत आहेत. दरम्यान, हा अपघात वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्याच क्षेपणास्त्रामुळे विमान पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इराणने अमेरिकन लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर काही वेळातच विमान दुर्घटना झाल्यानं असं म्हटलं जातं आहे. वाचा-इराणच्या चुकीमुळे 180 प्रवाशांचा मृत्यू? विमान दुर्घटना संशयाच्या भोवऱ्यात वाचा-इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला याआधी 2014 मध्ये युक्रेन रशिया यांच्यात संघर्ष सुरु असताना मलेशियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं होतं. तेव्हा रशियन समर्थक दलांनी संघर्षाची ठिणगी पडलेल्या भागातून उड्डाण करणारे विमान पा़डले होते. त्या विमानात 298 प्रवाशी होते त्यांचा मृत्यू झाला होता. दोन देशांच्या संघर्षात अशा प्रकारे विमान दुर्घटना झाल्याने इराणच्या हल्ल्यात विमान कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा-कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का? इराणच्या चुकीमुळे 180 प्रवाशांचा मृत्यू? इराण-अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर पुन्हा इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर डझनभर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने यात 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली. इराणच्याच क्षेपणास्त्रामुळे विमान पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाचा-तुम्ही मांसाहारी बकरी पाहिली आहे का? चला पाहा, चक्क अंडी खाऊन जगणारी बकरी इराकमध्ये पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. मात्र, या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच इराकमधील अमेरिकेच्या दुतावासावर इराण समर्थक मिलिशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Iran

    पुढील बातम्या