कीव 12 मार्च : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. हे नुकसान पैशांसोबतच माणसांच्या आयुष्याचंही आहे. रशिया आपल्या संपूर्ण ताकदीसह युक्रेनवर हल्ला करत आहे. तर युक्रेनही पूर्ण हिमतीने रशियाला प्रत्युत्तर देत आहे. यादरम्यान काही अशाही बातम्या समोर येत आहेत ज्यात युक्रेनचे नागरिक रशियन सैन्याचं सामान लुटून त्याचा वापर करत आहेत (Farmer Stole Russian Tanker). काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यात खारकीव येथील एका शेतकऱ्याने रशियन मिलिट्रीचा टँकच चोरी केला आणि बर्फात त्याच्या सवारीचा आनंद घेतला.
'...तर तिसरं महायुद्ध होईल'; युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अमेरिकेचा गंभीर इशारा
सध्या अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे. यात एक शेतकरी युद्धादरम्यान जंगलात फिरण्यासाठी गेला होता. तो अरबो रूपयांची युद्धनौका घेऊन बाहेर पडला. या टँकमधून क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते. हा व्यक्ती आता हा टँक आपला असल्याचं सांगत आहे. त्याने तो आपल्या घराबाहेर पार्क करून ठेवला आहे. या युद्धात रशियाचं मोठं नुकसान होत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात त्यांचे सैनिक आपला जीव गमावत आहेत. यासोबतच त्याचे अनेक फायटर टँकरही चोरीला जात आहेत. या शेतकऱ्यानेही तेच केलं आणि आता तो सुमारे 15 अब्ज किमतीच्या युद्धनौकेचा मालक बनला आहे.
सोशल मीडिया साइट ट्विटरवर या शेतकऱ्याबद्दल ओरिक्स नावाच्या पेजवर शेअर केलं गेलं आहे. या बातमीबद्दल ट्विट करून सांगण्यात आलं आहे. त्याचं नाव इगोर आहे. इगोर रोज सकाळी जंगलात फिरायला जातो. आज सकाळी तो बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत रशियन लष्कराचे 9K330 Tor SAM होतं. त्याला हे लष्करी टँक जंगलात सापडलं आणि आता इगोर या 15 अब्ज युद्धनौकेचा मालक आहे.
इगोर या शेतकऱ्याला मिळालेल्या टँकचं नाव द टोर आहे. हे सोव्हिएत युनियनमध्ये बनवले आहे. हे टँक सर्व ऋतूंत चालतं आणि अतिशय शक्तिशाली आहे. ते मध्यम आणि कमी पल्ल्यात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागतं. जमिनीवरून विमान, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे आणि इतर गोष्टी नष्ट करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. आता युक्रेनमध्ये असा कायदा आला आहे, ज्याच्या अंतर्गत नागरिकांनी रशियन सैनिकाची हत्या केल्यास त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार नाही. तसेच, युक्रेनियन नागरिक आता रशियन मालमत्ता जप्त करू शकतात. हा कायदा झाल्यापासून युक्रेनियन नागरिकांकडून रशियन सैन्याची प्रचंड लूट सुरू आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.