कीव, 18 मार्च: कीवमधील निवासी इमारतीवर रशियानं (Russia) रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनची अभिनेत्री (Ukrainian actress) ओक्साना श्वेट्सचा (oksana shvets) मृत्यू झाला आहे. ओक्सानाच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली असून तिच्या मंडली यंग थिएटरने एक निवेदन जारी केलं आहे. युक्रेनमधील एक कलाकार ओक्साना श्वेट्स कीवमधील निवासी इमारतीवर रॉकेट हल्ल्यात ठार झाली, असं निवेदनात म्हटलं आहे.
हॉलिवूड रिपोर्टरच्या मते, ओक्साना 67 वर्षांची होती. तिला युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एकानं सन्मानित करण्यात आलं आहे, ज्याला व्यापकपणे 'युक्रेनचा सन्मानित कलाकार' म्हणून ओळखलं जातं.
बायडेन यांनी पुतीन यांना म्हटलं युद्ध गुन्हेगार
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा नागरिकांवर झालेल्या विनाशकारी परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतीन यांचे "युद्ध गुन्हेगार" म्हणून वर्णन केलं आहे. त्यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना रशियाने याला राष्ट्रप्रमुखाने अक्षम्य वक्तृत्व" म्हटलं आहे. मला वाटते की ते (पुतिन) युद्ध गुन्हेगार आहेत, बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितलं.
रशियन हल्ले सुरुच; हल्ल्यात 21 ठार
गेल्या 24 तासांत रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war) युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूर्व युक्रेनमध्ये ( eastern Ukraine) 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रशिया युक्रेनवर जोरदार हल्ले करत असून या गोळीबारामुळे एकूण 53 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युद्धाचा सामना करत असलेल्या युक्रेनमध्ये 22 व्या दिवशीही अशांतता कायम आहे. रशियन क्षेपणास्त्रे आणि बॉम्बमुळे तीन शहरांतील अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. मध्यरात्रीही हल्ले होत आहेत आणि दिवसाही अनेकदा स्फोट होत आहेत. राजधानी कीवला सर्वाधिक लक्ष्य करण्यात आलं असून मध्यरात्रीही हल्ला करण्यात आला आहे.
रशियाने निवासी भागातील नागरिकांची घरे आणि इमारतींना लक्ष्य केल्याचं वृत्त युक्रेनियन माध्यमांनी दिलं आहे. रशियन सैन्य जोरदार हल्ला करत आहे. कीव नंतर खार्किववर जोरदार गोळीबार झाला आणि संपूर्ण शहर नष्ट झालं आहे. शेकडो घरांचे नुकसान झालं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.