मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia Ukraine War: युक्रेननं फेटाळला चर्चेचा प्रस्ताव, संतापलेल्या Russia नं केली मोठी घोषणा; सर्व बाजूंनी करणार हल्ला

Russia Ukraine War: युक्रेननं फेटाळला चर्चेचा प्रस्ताव, संतापलेल्या Russia नं केली मोठी घोषणा; सर्व बाजूंनी करणार हल्ला

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine) युद्ध (war) अधिक तीव्र होणार आहे. युक्रेनने बेलारूसमध्ये (Belarus) चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर रशियाचा भडका उडाला आहे.

  मॉस्को, 27 फेब्रुवारी: रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine) युद्ध (war) अधिक तीव्र होणार आहे. युक्रेनने बेलारूसमध्ये (Belarus) चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर रशियाचा भडका उडाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं (Russia's Defense Ministry) शनिवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, कीवनं बेलारूसमध्ये चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर रशियन सैन्याला युक्रेनमध्ये सर्व दिशांनी आक्रमण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युक्रेनवर आता चारही दिशांनी हल्ला केला जाईल, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेननं रशियाचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाईल. रशियाचे आक्रमण तीव्र जारी केलेल्या निवेदनात रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, लष्कराला आपला हल्ला तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आता सर्व दिशांनी हल्ले केले आहेत. बेलारूसमध्ये होणाऱ्या चर्चेचा प्रस्ताव कीवने फेटाळला आहे. आता माहितीसाठी सांगतो की, काल रशियाने युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. रशियाचे शिष्टमंडळ Belarus ला पाठवले जाईल, असे त्या प्रस्तावात म्हटलं होतं. पण आता युक्रेननं तो प्रस्ताव फेटाळल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालय करत आहे. रशियन सैन्याचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, युक्रेनियन बाजूने वाटाघाटी प्रक्रिया नाकारल्यानंतर, आज सर्व युनिट्सला ऑपरेशनच्या योजनांनुसार सर्व दिशांनी हल्ला तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले. IND vs SL : टीम इंडियासाठी काळजीची बातमी, प्रमुख खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल युक्रेननं या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून धोक्याची घंटा वाजली आहे. युक्रेनच्या भूमीवर कहर करणारे रशियन सैनिक आता अधिक वेगाने आणि धोकादायक पद्धतीने हल्ले करणार आहेत. वरून फर्मान आलं आहे, अशा स्थितीत आजचा दिवस अधिक भयावह ठरू शकतो. आजच रशियन सैन्याचा जबरदस्त भडिमार झाला, दोन ते तीन भीषण बॉम्बस्फोट झाले, आता या घोषणेनंतर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. युक्रेननं रशियाचा प्रस्ताव नाकारला शुक्रवारी रशियाने युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. रशियाचे एक शिष्टमंडळ बेलारूसला पाठवले जाईल, असे त्या प्रस्तावात म्हटलं होतं. पण आता युक्रेननं तो प्रस्ताव फेटाळल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालय करत आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Russia Ukraine, Ukraine news

  पुढील बातम्या