मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Ukraine President Zelensky's family: युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर; दोन मुलांसह असं आहे कुटुंब

Ukraine President Zelensky's family: युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर; दोन मुलांसह असं आहे कुटुंब

झेलेन्स्की यांचा महत्त्वाचा व्हिडीओ संदेश समोर आला असून, त्यात ते त्यांची पत्नी आणि मुलांसोबत बोलताना काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले. 'रशियाचे पहिले लक्ष्य मी आहे आणि माझे कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे', असं या व्हिडीओत ते बोलताना दिसले.

झेलेन्स्की यांचा महत्त्वाचा व्हिडीओ संदेश समोर आला असून, त्यात ते त्यांची पत्नी आणि मुलांसोबत बोलताना काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले. 'रशियाचे पहिले लक्ष्य मी आहे आणि माझे कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे', असं या व्हिडीओत ते बोलताना दिसले.

झेलेन्स्की यांचा महत्त्वाचा व्हिडीओ संदेश समोर आला असून, त्यात ते त्यांची पत्नी आणि मुलांसोबत बोलताना काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले. 'रशियाचे पहिले लक्ष्य मी आहे आणि माझे कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे', असं या व्हिडीओत ते बोलताना दिसले.

पुढे वाचा ...
मुंबई, 25 फेब्रुवारी: युक्रेनला (Russia Ukraine War) 'नाटो'चं (NATO) सभासदत्व मिळू नये, यासाठी रशिया आक्रमक झाला आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध (Russia Attacked Ukraine) पुकारलं आहे. रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. रशियाने युद्ध पुकारल्याने युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमर झेलेन्स्की (President Volodymyr Zelensky) काहीसे हताश दिसत आहेत. मात्र झेलेन्स्की आणि युक्रेनचे सैन्य रशियाच्या सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या संघर्षामुळे राष्ट्रपती व्होलोडिमर झेलेन्स्की सध्या विशेष चर्चेत आले आहेत. झेलेन्स्की यांचा महत्त्वाचा व्हिडीओ संदेश समोर आला असून, त्यात ते त्यांची पत्नी आणि मुलांसोबत बोलताना काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले. 'रशियाचे पहिले लक्ष्य मी आहे आणि माझे कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे', असं या व्हिडीओत ते बोलताना दिसले. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबात कोण व्यक्ती आहेत, त्या काय करतात याविषयीची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे. हे वाचा-युद्धग्रस्त युक्रेनचे फोटो आले समोर! शहरात स्मशानशांतता; जमिनीखाली सुरू आहे जगणं युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमर झेलेन्स्की हे सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह आहेत. ते सातत्यानं कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. युक्रेनच्या प्रथम महिला आणि राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या पत्नीचं नाव ओलेना व्होलोदोमिरिवाना झेलेन्स्की (Olena Volodymyrivna Zelenska) असं आहे. ओलेना या युक्रेनी आर्किटेक्ट आणि पटकथा लेखिका आहेत. डिसेंबर 2021 मध्ये फोकस मॅगझिनच्या 100 सर्वांत प्रभावशाली युक्रेनियन नागरिकांच्या यादीत ओलेना 30 व्या स्थानावर होत्या.
ओलेना आणि व्होलोडिमर 2003 मध्ये विवाहबद्ध झाले. रिपोर्ट्सनुसार ओलेना क्रिवी रिह नॅशनल युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असली तरी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर फिल्डच्या तुलनेत पटकथा लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी सर्वाधिक काम केलं आहे. ओलेना सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) देखील आहेत. कोरोना काळात त्यांनी अनेक कामे केली आहेत. अनेकदा त्या सामाजिक कामांमध्ये सहभागी झाल्याचंही दिसलं आहे. हे वाचा-2019 पासूनच रशिया करत होतं युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी? धक्कादायक माहिती समोर राष्ट्रपती झेलेन्स्की आणि त्यांची पत्नी ओलेना या दांपत्याला दोन मुलं आहेत. त्यापैकी मुलाचं नाव किरिलो (Kyrylo) तर मुलीचे नाव ओलेक्झांड्रा (Oleksandra) असं आहे. झेलेन्स्की यांनी मुलांसमवेत एक फॅमिली फोटो शेअर केला होता. 15 जुलै 2019 रोजी मुलीच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं होतं की 'माझी मुलगी आता 17 वर्षांची झाली आहे'. मुलगा किरिलोविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी, एका वृत्तानुसार, किरोलोचा जन्म 2013 मध्ये झाला आहे. तो आता आठ-नऊ वर्षाचा असून, शिक्षण घेत आहे.
झेलेन्स्की यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचं झालं तर, एका वृत्तानुसार 44 वर्षांच्या व्होलोडिमर याचं जीवन आणि कारकीर्द युक्रेनमधल्या अन्य नेत्यांच्या तुलनेत काहीशी कठीण राहिली. पदभार स्वीकारताच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. व्होलोडिमर झेलेन्स्की यांनी 2000 मध्ये कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी मिळवली. त्यांना कॉमेडीची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 1997 मध्ये इतर काही कलाकारांसह 'क्वार्टल 95' हा कॉमेडी ग्रुप स्थापन केला. त्यानंतर 2003 पासून या ग्रुपने शो करायला सुरुवात केली. यानंतर एका शोमुळे ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यातून राजकीय पक्ष स्थापन केला. 2018 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 'सर्व्हंट ऑफ द पीपल पार्टी'कडून राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते 73 टक्क्यांहून अधिक मतं मिळवत विजयी झाले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे चिंतेत असलेल्या राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असं म्हटलं आहे.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

पुढील बातम्या