मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Ukraine President Volodymyr Zelenskyy: युक्रेनचा खरा हिरो..! वोलोडिमिर झेलेन्स्की एकेकाळी होते देशातले प्रसिद्ध कॉमेडियन

Ukraine President Volodymyr Zelenskyy: युक्रेनचा खरा हिरो..! वोलोडिमिर झेलेन्स्की एकेकाळी होते देशातले प्रसिद्ध कॉमेडियन

रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. आज (26 फेब्रुवारी) युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियाकडून (Russia attacked on Ukraine) युक्रेनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधली परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
कीव, 27 फेब्रुवारी: रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. आज (26 फेब्रुवारी) युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियाकडून (Russia attacked on Ukraine) युक्रेनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या युद्धाच्या परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांचं विशेष कौतुक केलं जात आहे. झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी रशियाविरोधात आपण लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी देशाच्या दक्षिण-पूर्व भागात आपल्या कुटुंबासह लहानपण घालवलं. त्यामुळे त्याचं ज्यू कुटुंब रशियन बोलायचे आणि त्यांच्या वडिलांनी झेलेन्स्की यांना इस्रायलला शिकण्यासाठी जाण्यास बंदी घातली होती. परदेशात शिक्षण घेण्याऐवजी झेलेन्स्की यांनी स्वतःच्या देशात कायद्याचं शिक्षण घेतलं. पदवीनंतर त्यांनी अभिनय आणि विशेषतः कॉमेडी क्षेत्र निवडलं. तेथून, 2010 मध्ये, सर्व्हंट ऑफ द पीपल या टीव्ही मालिकेद्वारे ते युक्रेनचा टॉप एंटरटेनर बनले. या मालिकेत, झेलेन्स्की यांनी एका लोकप्रिय हायस्कूल शिक्षकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यात जो शिक्षक भ्रष्ट राजकारण्यांकडून छळ झाल्यानंतर अखेरीस देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो. मालिकेच्या काही वर्षानंतर, झेलेन्स्की प्रत्यक्षात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि या आठवड्यात रशियन सैन्य त्यांच्या देशावर विशेषतः ऐतिहासिक कीवमध्ये रॉकेट उडवत आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, जगभर भीतीचे वातावरण आहे आणि झेलेन्स्की यांची नवी भूमिका आता कदाचित 21व्या शतकातील हिरोची झाली आहे. अशा परिस्थितीतही, 44 वर्षीय झेलेन्स्की यांनी कीव सोडण्यास नकार दिला आहे, तर ते म्हणतात की, ते रशियाचे लक्ष्य आहेत. एकेकाळी झेलेन्स्की यांना कमकुवत मानणारे राजकीय निरीक्षक म्हणतात की ते त्यांच्या उदाहरणावरून प्रेरित आहेत. जेव्हा अमेरिकेनं त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची ऑफर दिली, तेव्हा झेलेन्स्की यांनी शुक्रवारी उत्तर दिलं, मला शस्त्र हवं आहे, सुरक्षित मार्ग नाही. झेलेन्स्की यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि आज हल्ल्याचा चौथा दिवस आहे. आपण आपल्या कुटुंबासह राजधानी कीवमध्येच राहणार असून, देश सोडणार नसल्याचं झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही देशाचं रक्षण करतोय आणि आमच्या नागरिकांना एकटं सोडून कुठेही जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. सध्या झेलेन्स्की यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही फोटोजमध्ये ते सैनिकांसोबत सैनिकी वेशात दिसत आहेत. अलीकडेच रशियन माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या, की राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की राजधानी कीवमधून पळून गेले आहेत. या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं सांगून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आपल्याला संपवायचं असलं, तरी आपण राजधानी कीव सोडणार नाही, असं म्हटलं आहे. ते म्हणाले, की आम्ही आमच्या देशाचे रक्षण करत आहोत आणि यापुढेही करत राहू.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या