मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

युद्धाचे ढग! Ukraine वर मोठा Cyber Attack, रशियाचं सैन्यही सीमेवर

युद्धाचे ढग! Ukraine वर मोठा Cyber Attack, रशियाचं सैन्यही सीमेवर

सरकारी यंत्रणेवर झालेला सायबर हल्ला एका बाजूला आणि 1 लाख सैन्यासह सीमेवर येऊन ठेपलेला रशिया दुसऱ्या बाजूला अशा कात्रीत सध्या युक्रेन अडकला आहे.

सरकारी यंत्रणेवर झालेला सायबर हल्ला एका बाजूला आणि 1 लाख सैन्यासह सीमेवर येऊन ठेपलेला रशिया दुसऱ्या बाजूला अशा कात्रीत सध्या युक्रेन अडकला आहे.

सरकारी यंत्रणेवर झालेला सायबर हल्ला एका बाजूला आणि 1 लाख सैन्यासह सीमेवर येऊन ठेपलेला रशिया दुसऱ्या बाजूला अशा कात्रीत सध्या युक्रेन अडकला आहे.

  • Published by:  desk news

किव्ह, 14 जानेवारी: युक्रेनवर (Ukraine) मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला असून सर्व सरकारी वेबसाईट (Government Websites) हॅक (Hacked) करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी रशियाने (Russia) युक्रेन सीमेवरील (border) आपलं सैन्य वाढवलं असून अतिरिक्त 1 लाख फौजा तैनात केल्या आहेत. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊन युद्धाचे ढग जमू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. युक्रेनवर झालेला सायबर हल्ला कुणी केला, याचे कुठलेही पुरावे समोर आले नसले तरी युक्रेननं पहिला संशय रशियावरच व्यक्त केला आहे. अमेरिकेनंही युक्रेनच्या बाजूनं आपलं वजन टाकलं आहे. 

सरकारी वेबसाईट हॅक

युक्रेनच्या जवळपास सर्व महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. युक्रेन सरकारनं जाहीर केलेल्या माहितीनुसार विदेश मंत्रालय, कृषी मंत्रालय, शिक्षण मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या खात्यांच्या वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या असून सर्व डेटा डिलिट करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हॅकर्सनी दिलेल्या संदेशात ‘युक्रेनच्या नागरिकांनो, तुमच्या सरकारचा सर्व डेटा आता आमच्या ताब्यात असून तो सार्वजनिक करण्यात आला आहे. सर्व डेटा नष्ट करण्यात आला असून आता तो रिस्टोअर करणं शक्य नसल्याचं या संदेशात म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण?

सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात छुपा संघर्ष सुरू आहे. युक्रेनची राजधानी किव्ह हे ऐतिहासिक शहर असून मॉस्कोएवढेच महत्त्व या शहराला आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व अनेक रशियन मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. तसं झालं तर आशियातील रशियाचं महत्त्व कमी होईल, अशी भीती रशियाला आहे. 

हे वाचा -

अमेरिकेनं दिला इशारा

रशियानं युक्रेनपाशी सैन्य हलवल्यानंतर अमेरिकेनं रशियाला इशारा दिला आहे. जर युद्ध झालं, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल, अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. पुरावे नसल्यामुळे युक्रेनवरील सायबर हल्ला कुणी केला, हे सांगता येणार नाही, मात्र प्रत्येकजण कल्पना करू शकतो, असं म्हणत अमेरिेकनंही रशियाकडेच इशारा केला आहे. या परिस्थितीमुळे तणाव वाढला असून युद्धाचे ढग जमू लागले आहेत. 

First published:

Tags: America, Cyber crime, Russia, Ukraine news