Home /News /videsh /

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच युक्रेनमध्ये लपवला येशू ख्रिस्ताचा पुतळा! जाणून घ्या कारण?

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच युक्रेनमध्ये लपवला येशू ख्रिस्ताचा पुतळा! जाणून घ्या कारण?

रशियन हल्ल्यांदरम्यान, युक्रेनने ल्विव्ह शहरात असलेल्या चर्चमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा हटवून अज्ञात स्थळी लपवला आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या महायुद्धाच्या आधीही निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाचे सर्व प्रयत्न करूनही रशिया हा हल्ला थांबवण्यास तयार नाही.

पुढे वाचा ...
    कीव, 8 मार्च : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध (Ukraine-Russia War) सुरूच आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, युक्रेनमधील ल्विव्ह (Lviv) येथील अर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा (Sculpture of Jesus Christ)  हटवून अज्ञातस्थळी नेण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा पुतळा लपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1939-1945 या काळातही असंच घडलं ईस्टर्न युरोपीयन मीडिया संस्था नेक्स्टाने मंगळवारी वृत्त दिले की युक्रेनने रशियन हल्ल्यांदरम्यान ल्विव्ह शहरातील आर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा हटवला आहे. अधिकाऱ्यांनी हा पुतळा अज्ञात ठिकाणी लपवून ठेवला आहे. शेवटच्या वेळी दुसऱ्या महायुद्धादरम्यान (World War II, 1939-1945) येशूची ही मूर्ती चर्चमधून बाहेर काढत लपवण्यात आली होती. युक्रेनचे खासदार ताब्यात त्याचवेळी युक्रेनचे खासदार येवगेन शेवचेन्को यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. शेवचेन्को देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. युक्रेनियन सरकारच्या आदेशानुसार, शेवचेन्को यांना देश सोडण्याचा अधिकार नाही. कारण, अनिवार्य लष्करी सेवेनुसार, ते युद्धाच्या वयाचे आहेत. शेवचेन्को गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना भेटल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यामुळे, शेवचेन्को यांना सत्ताधारी पक्ष, सर्व्हंट्स ऑफ द पीपल्समधून काढून टाकण्यात आले. या पक्षाचे खासदार वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणखी एक मेजर जनरल मारल्याचा दावा दुसरीकडे युक्रेनने रशियन लष्कराच्या मेजर जनरलला ठार केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांचा युद्धात मृत्यू झाला आहे. मात्र, रशियाकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. एका आठवड्यात हे दुसरे मेजर जनरल आहेत, ज्यांच्या मृत्यूचा दावा युक्रेनने केला आहे. यापूर्वी 3 मार्च रोजी युक्रेनने रशियाचे मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांच्या मृत्यूचा दावा केला होता.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या