मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा कीववर हल्ला, हिंसक स्फोटाचा भयानक आवाज; Live Video

Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा कीववर हल्ला, हिंसक स्फोटाचा भयानक आवाज; Live Video

Russia Ukraine War: रशियानं युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. या युद्धाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून युद्धाची भीषणता दिसून येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
कीव, 03 मार्च: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. रशियानं युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. या युद्धाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून युद्धाची भीषणता दिसून येत आहे. आताच एक भयानक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ युक्रेनची राजधानी कीवमधला आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीववर सतत हल्ले करत आहे. कीव सध्या रशियन सैन्याच्या हल्ल्याखाली आहे. कीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सतत वाजत आहेत. कारण संपूर्ण कीवमध्ये हिंसक स्फोट होत आहेत. याचाच आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये टीव्ही टॉवरवर मिसाइल हल्ला याआधी रशियन सैन्याने एका टीव्ही टॉवर हल्ला चढवला आहे. मिसाईलचा मारा करून टॉवर उद्धवस्त केलं आहे. युक्रेनमधील टीव्ही टॉवरवर हल्ला चढवून उद्धवस्त केलं. मिसाईलचा मारा करून पूर्ण टॉवर नष्ट केलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर युक्रेनमध्ये संपूर्णपणे टीव्ही आता बंद पडले. रशियन सैनिकांच्या हल्ल्याचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली का, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. कीव शहरात रशियन सैन्यानं जोरदार हल्ला चढवला आहे. लाखो रहिवासी हे युक्रेनमधून पलायन करत आहे. पंतप्रधान मोदींचा दुसऱ्यांदा पुतिन यांना फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा केली आहे. त्यावर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे. खार्किवमध्ये अजूनही मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यातच रशियानं खार्किव ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल पीएम मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी रशियन सैन्य आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या