लंडन, 25 नोव्हेंबर : जगात अनेक चित्रविचित्र खटले आपण ऐकतो. आता यूकेतील एका 20 वर्षांच्या तरुणीनेही असाच विचित्र खटला दाखल केला आहे. महत्त्वाचा म्हणजे हा खटला तिने तिच्या जन्मावेळी तिच्या आईला सल्ला देणाऱ्या डॉक्टरांविरोधात आहे (UK woman with rare-condition sues moms doctor). यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. आपल्या आईला डॉक्टरांनी चुकीचा सल्ला दिला आणि त्यामुळे आपण अशा अवस्थेत जन्माला आलो, असा आरोप तिने केला आहे.
इंग्लंडच्या (England) स्केग्नेस इथं राहणारी राहणारी एव्ही टूम्बस (Evie Toombes). ही शो शो जंपर (Show Jumper) आहे. आपल्या आईच्या डॉक्टरला तिने कोर्टात खेचलं आहे. एव्ही स्पाइना बिफिदा (Spina Bifida) या विकारानं एव्ही ग्रस्त आहे. या आजारात बाळ जन्माला येतानाच त्याच्या पाठीचे मणके आणि कण्यात कायमस्वरूपी दोष असतो. एव्हीच्या म्हणण्यानुसार ती अशा पद्धतीने जन्माला येण्यास कारणीभूत आहे तो डॉक्टर.
तिच्या आईला गर्भधारणेआधी फॉलिक ॲसिडच्या सप्लिमेंट्स घेण्याची गरज होती. स्पाइना बिफिदाचा धोका कमी करण्यासाठी ते आवश्यक होतं. “डॉ. फिलिप यांनी मला फॉलिक ॲसिडची गरज नाही असा सल्ला दिला होता. मी योग्य आणि पुरेसा आहार घेतला तर मला फॉलिक ॲसिडची गरज लागणार नाही असं डॉक्टर म्हणाले होते,” असं एव्हीच्या आईने न्यायाधीशांना सांगितल्याचं वृत्त The Scottish Sun नं दिलं आहे.
हे वाचा - तीव्र वेदना सहन करत पायाच्या तळव्यावर काढला टॅटू, फोटोसाठी येतेय लाखोंची ऑफर
एव्हीच्या वकील मिसेस रोडवे यांच्या मते एव्हीच्या आईवडिलांनी बाळाला जन्म द्यायचा नाही असा विचार केला होता; पण डॉ. फिलिप यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी बाळ जन्माला घालायचं ठरवलं. “डॉ. फिलिप यांनी मिसेस टूम्बेसला योग्य सल्ला दिला असता, तर गर्भवती होण्याचा निर्णय त्यांनी तातडीनं घेतला नसता. उलट फॉलिक ॲसिडची ट्रीटमेंट पूर्ण केली असती,” असं मिसेस रोडवे यांचं म्हणणं आहे.
एव्हीला Lipomyelomeningocele (LMM) हा आजार आहे. यामध्ये मणक्याकडे जाणाऱ्या नळीमध्येच दोष असतो. त्यामुळे तिच्या हालचालींवर मर्यादा आहेत. हा आजार आणि तिचं अवलंबित्व वयानुसार वाढत जाणार असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं आहे. एव्हीचं वय वाढत जाईल, तसं तिचं व्हीलचेअरवरचं अवलंबित्वही वाढेल असं यात म्हटलं आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आपल्याला वेदनापूर्ण आयुष्य जगावं लागत आहे असा एव्हीचा आरोप आहे.
तर डॉक्टरांनी या जोडप्याला योग्य तोच सल्ला दिल्ला होता, असं म्हणत डॉ. फिलिप यांच्या वकिलांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
हे वाचा - प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या कुत्रिम आहारामुळे त्यांच्यात होणारे बदल धक्कादायक!
विशेष म्हणजे हा आजार असूनही एव्हीनं शो जंपिंगच्या क्षेत्रात अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तिला 2008 मध्ये ‘Inspiration Young Person Award’नं ही गौरवण्यात आलं आहे. त्या वेळेस तिला डचेस ऑफ ससेक्स (Dutches of Sussex) मेगन मार्केलला (Megan Markel) भेटायचीही संधी मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Rare disease, Serious diseases, Uk, World news