बोरिस जॉन्सन यांना ऑक्सिजननं कसं वाचवलं? कोरोनाला हरवल्यानंतर पंतप्रधानांकडून खुलासा

बोरिस जॉन्सन यांना ऑक्सिजननं कसं वाचवलं? कोरोनाला हरवल्यानंतर पंतप्रधानांकडून खुलासा

'कोरोनानं काहीच दिवसांमध्ये माझी प्रकृती खूप खालवली होती. यावर कोणाचा विश्वास बसणं कठीण होतं.'

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला आहे. 26 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. यावेळी त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारासंदर्भात जॉन्सन यांनी अनेक खुलासे केले आहेत. कोरोना व्हायरसची लागण जॉन्सन यांना झाली त्यानंतर त्यांच्यावर कसे उपचार करण्यात आले आणि त्यांनी या व्हायरसविरोधात कसा यशस्वी लढा दिला आहे हे सांगितलं.

सनने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्यांना जिवंत राहण्यासाठी अनेक लीटर ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. त्यावेळी जॉन्सर यांच्या डोक्यात फक्त या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं एवढाच विचार होता. आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे हाच एक विचार मनात आणि डोक्यात होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांसोबत इच्छाशक्तीही तेवढीच महत्त्वाची असते.

हे वाचा-सस्पेन्स संपला! 21 दिवसांनंतर जगासमोर आले किम जोंग उन, पाहा PHOTO

जॉन्सन म्हणतात, 'कोरोनानं काहीच दिवसांमध्ये माझी प्रकृती खूप खालवली होती. यावर कोणाचा विश्वास बसणं कठीण होतं. खूप काळजी घ्यावी लागणार होती. तरच या कोरोनावर यशस्वीपणे मात करणं शक्य होतं. डॉक्टरांना माझ्या प्रकृतीबाबत पूर्वकल्पना असल्यानं त्यांनी आधीच पुढची योजना आखली होती. डॉक्टरांच्या कठोर परिश्रमामुळे मी या महासंकाटवर मात करू शकलो.' जॉन्सन यांना डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवस त्यांच्या पत्नीनं गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यांनी आपल्या मुलांची नावं ज्या डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले त्यांच्या नाववरून ठेवली आहेत.

हे वाचा-भयंकर! भुकेल्या लेकरांचं सांत्वन करण्यासाठी आईनं चुलीवर दगड ठेवला उकळत आणि...

First published: May 3, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या