मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोरोनाच्या संकटात किम जोंग यांनी रचले जगाला हादरवणारे 3 प्लॅन, ब्रिटनला मिळाला पुरावा

कोरोनाच्या संकटात किम जोंग यांनी रचले जगाला हादरवणारे 3 प्लॅन, ब्रिटनला मिळाला पुरावा

असे म्हटले जात आहे की उत्तर कोरिया आपला सर्वात मोठा मित्र असलेल्या चीनला खुश करण्यासाठी हे करीत होता.

असे म्हटले जात आहे की उत्तर कोरिया आपला सर्वात मोठा मित्र असलेल्या चीनला खुश करण्यासाठी हे करीत होता.

असे म्हटले जात आहे की उत्तर कोरिया आपला सर्वात मोठा मित्र असलेल्या चीनला खुश करण्यासाठी हे करीत होता.

प्याँगयांग, 07 सप्टेंबर : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim jong un) हे एक धोकादायक प्लॅन रचत असल्याचे समोर आले आहे. ब्रिटीश गुप्तचर संस्था एमआय -6 ने हा दावा केला आहे. एमआय -6 ने रविवारी कळवले की त्यांनी किम जोंग सरकारने आपल्या गुप्तचर संस्थेच्या एजंटांना फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यासाठी एक मेसेज पाठविला होता.

गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार, या मेसेजमध्ये फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा मेसेज डिकोड झाल्यानंतर किम यांनी एजंटांना पुढील ऑर्डरची प्रतीक्षा करण्यास सांगितले. एक्स्प्रेस यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स डिजिटल टीमशी संबंधित विश्लेषकांनी फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामधील उत्तर कोरियाच्या कटचा खुलासा केला आहे. उत्तर कोरियाच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या एका नागरिकाला पकडल्यानंतर या प्लॅनबाबत माहिती मिळाली.

वाचा-'किम जोंग यांनी मला सर्वांसमोर...', ट्रम्प यांच्या सेक्रेटरीनं केला खुलासा

हे आहेत 3 प्लॅन

या रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाची गुप्तचर यंत्रणेची पहिली कारवाई युरोपियन एअर ग्रुपमधील फ्रान्सच्या योगदानाशी जोडली असल्याचे समोर आले आहे. तर दुसरे ऑपरेशन ऑस्ट्रेलियामधील लष्करी एअरबेसशी संबंधित होते. रिपोर्टनुसार, तिसरे ऑपरेशन ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया दरम्यान नुकत्याच झालेल्या कृषि व्यापार कराराबाबत होते.

वाचा-UAEमध्ये राहणाऱ्या भारतीयाला लागला जॅकपॉट, एका रात्रीत झाला कोट्यधीश!

ब्रिटननं उधळून लावला प्लॅन

वृत्तानुसार ब्रिटनने हा संदेश डीकोड करुन तातडीने याची माहिती अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील गुप्तचर संस्थांना दिली. या मेसेजचा संपूर्ण भाग डिकोड करण्यास अद्याप बराच काळ लागेल. गेल्याच आठवड्यात, उत्तर कोरियाकडून आणखी एक मेसेज डीकोड करण्यात आला, त्यानंतर किम यांनी आपल्या गुप्तहेरांना पुढील ऑर्डरची प्रतीक्षा करण्यास सांगितले. असे म्हटले जात आहे की उत्तर कोरिया आपला सर्वात मोठा मित्र असलेल्या चीनला खुश करण्यासाठी हे करीत होता. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध सध्या चीनशी चांगले नाहीत. अशा परिस्थितीत या दोन देशांमध्ये काही गडबड झाल्यास त्याचा फायदा फक्त चीनला होईल.

First published:
top videos

    Tags: Kim jong un