विजय मल्ल्या भारतात येणार का? ब्रिटनमध्ये घडली एक मोठी घटना

विजय मल्ल्या भारतात येणार का? ब्रिटनमध्ये घडली एक मोठी घटना

ब्रिटनच्या हायकोर्टात मल्ल्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याचं भारतातलं प्रत्यार्पण नक्की समजलं जात होतं. त्यासाठी ब्रिटनमध्ये CBIची टीमही हजर होती.

  • Share this:

लंडन 4 जून: देशातल्या अनेक बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणारा उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना धक्का लागला आहे. मल्ल्याचं प्रत्यार्पण लांबणीवर पडलं आहे, ब्रिटनच्या कोर्टाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर मल्ल्याचा भारताच्या स्वाधीन केलं जाईल असं समजलं जात होतं. मात्र ब्रिटीश उच्चायुक्तांनी या प्रकरणी आणखी एक प्रक्रिया राहिली असल्याचं म्हटलं आहे. ती नेमकी काय आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही. ही प्रक्रिया गुप्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनच्या हायकोर्टात मल्ल्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याचं भारतातलं प्रत्यार्पण नक्की समजलं जात होतं. त्यासाठी ब्रिटनमध्ये CBIची टीमही हजर होती. त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याला तातडीने भारतात आणण्याची योजनाची तयार केली गेली होती. मात्र शेवटच्या क्षणी अडचण सांगितली गेली.

विमानतळावर आल्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट होणार केली जाणार होती. त्यानंतर त्याला कोर्टात दाखल केलं जाणार होतं. मुंबईतल्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ऑर्थर रोड जेलमध्ये त्याला एका विशेष कोठडीत ठेवलं जाणार आहे. EDसुद्धा त्याची कस्टडी मागणार असून आर्थिक गैरव्यव्हराची चौकशी केली जाणार आहे.

मल्ल्याने विविध बँकांचं 9000 कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडवलं आहे. कर्ज न फेडताच तो भारतातून पळून गेला होता. गेली अनेक वर्ष त्याने कोर्टाच्या माध्यमातून भारतात येण्यास टाळाटाळ चालविली होती. मात्र त्याचे सर्व प्रयत्न फसले आणि अखेर ब्रिटनच्या कोर्टाने त्याला भारताच्या स्वाधीन केलं आहे.

हे वाचा - 

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला भगदाड, भाजपची ताकद वाढणार?

क्षणात 7 बस जळून खाक! अज्ञात टोळक्याने पेट्रोल टाकून स्टँडवर उभ्या बस पेटवल्या

त्या आईसाठी जवान झाला 'कॅप्टन रेल्वे' चालत्या ट्रेनमध्ये पोहोचवलं दुधाचं पॅकेट

 

 

 

First published: June 4, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या