'भारताचा जावई' पुन्हा एकदा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी; मिळालं मोदींसारखंच मोठं बहुमत

'भारताचा जावई' पुन्हा एकदा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी; मिळालं मोदींसारखंच मोठं बहुमत

ब्रेग्झिटच्या तोंडावर झालेल्या ब्रिटीश निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सत्तारुढ हुजूर पक्षाला (Conservative party)मोठं बहुमत मिळालं. सध्याचे ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या गळ्यात पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळणार आहे.

  • Share this:

लंडन, 13 डिसेंबर : ब्रेग्झिटच्या BREXIT तोंडावर झालेल्या ब्रिटीश निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सत्तारुढ हुजूर पक्षाला (Conservative party)मोठं बहुमत मिळालं. सध्याचे ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या गळ्यात पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळणार आहे. आपलं भारताची विशेष नातं असल्याचं ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगत होते. आपण भारताचे जावई असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. अर्थातच त्यांच्या विजयात ब्रिटनस्थित मूळच्या भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी भूमिका असल्याचं मानलं जात आहे.

युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटनमध्ये UK Elections सार्वत्रिक निवडणुका काल झाल्या. त्यात बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाने बहुमत मिळवलं आहे. युरोपातून वेगळं होण्याची प्रक्रिया (BREXIT)आता जॉन्सन लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

भारताशी नातं

बोरिस जॉन्सन यांचा भारतीय विशेषतः हिंदू समर्थक नेता मानलं जातं. त्यांना अनिवासी भारतीयांचा पाठिंबा मिळाला, असं मानलं जातं. त्यांनी स्वतः अनेकवेळा आपण भारताचे जावई असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी काही ठिकाणी प्रचारादरम्यान हिंदी चित्रपट गीतंही वाजवली होती.

बोरिस जॉन्सन पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. ते पूर्वी लंडनचे मेयरसुद्धा होते. त्यानंतर त्यांना परराष्ट्र मंत्री केलं गेलं आणि ब्रेग्झिटच्या मुद्द्यावर तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस पंतप्रधान झाले.

बोरिस जॉन्सन यांची सध्याची पत्नी मरिना व्हीलर यांची आई दीप जन्माने भारतीय शीख होती. भारतीय मूळ असलेली पत्नी असल्याने आपल्याला भारतीय मतं मिळावीत, असं बोरिस अगोदर म्हणाले होते. खरंतर मरिना व्हीलर आणि बोरिस जॉन्सन यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.

ट्रंप यांच्याप्रमाणेच अवलिया नेता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्याप्रमाणेच बोरिस जॉन्सनसुद्धा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. सार्वजनिक जीवनात विस्कटलेल्या केसांच्या त्यांच्या नेहमीच्या स्टाइलनेच ते वावरत असतात. विनोदी आणि मजेशीर भाषणांमुळेही ते लोकप्रिय आहेत.

दरम्यान निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेऊन मजूर पक्षाच्या (labor party) जेरेमी कॉर्नबिन यांनी राजीनामा दिला आहे.

भारतीय पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे. भारत- ब्रिटन संबंध आणखी घट्ट होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या