लंडन कोर्टाचा माल्ल्याला दणका, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

लंडन कोर्टाचा माल्ल्याला दणका, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

  • Share this:

लंडन, 08 एप्रिल: भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या विजय माल्ल्या याला मोठा दणका बसला आहे. लंडनमधील न्यायालयात माल्ल्याने दाखल केलेली प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली आली आहे. त्यामुळे लवकरच माल्ल्याला भारतात आणता येणार आहे.

हे देखील वाचा: माझे पैसे घेऊन 'जेट'ला वाचवा- विजय मल्ल्या

PM मोदीजी, बँकांना सांगा माझ्याकडून पैसे घेण्यास- विजय मल्ल्या

गेल्या अनेक दिवसांपासून माल्ल्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. लंडन कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे भारतीय यंत्रणांना मोठे यश आल्याचे मानले जात आहे. माल्ल्याला भारतात आणण्याच्या दृष्टीने एक मोठे सकारात्मक पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

काय आहे मल्ल्या प्रकरण?

देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती.

भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर येवढं राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे.

मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.

या आधी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातल्या भांडणामुळे त्या दोघांनाही केंद्र सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी' हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.

काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading