Home /News /videsh /

कावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दावा

कावेबाजीला सुरुवात, रशिया युक्रेनमध्ये Puppet Government बनवत असल्याचा UK चा दावा

रशिया युक्रेनमध्ये पपेट सरकार तयार करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप युकेनं केला आहे.

    मॉस्को, 23 जानेवारी: रशिया (Russia) युक्रेनमध्ये (Ukraine) आपले समर्थक घुसवून पपेट सरकार (Puppet Government) तयार करू पाहत असल्याचा आरोप युनायडेट किंगडमनं (UK) केला आहे. एकीकडे युक्रेनवरून वाद सुरू असताना दुसरीकडे रशियाकडून कावेबाजीचा वापर होण्याची शक्यता असल्याचं मत युकेनं व्यक्त केलं आहे. त्यामुळे सध्या सैन्याची हलवाहलव, सायबर हल्ला आणि दोन्ही बाजूंकडून दिली जाणारी आव्हानं यात तिसरी बाजूदेखील समोर आल्याचं चित्र आहे. काय आहे आरोप? रशियाकडून युक्रेनच्या काही जुन्या नेत्यांशी संपर्क साधण्यात येत असून त्यांच्या मदतीनं युक्रेनचं सरकारच हातात घेण्याचा रशियाचा डाव आहे, असा आरोप ब्रिटीश परराष्ट्र सचिव लिझ ट्रूस यांनी केला आहे. युक्रेनमध्ये सध्या सायबर हल्ला झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती आहे. त्यात रशियाने आपले 1 लाख सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केले आहेत. अशा परिस्थितीत अंतर्गत गोंधळ आणि बाह्य दबाव याचा वापर करत सरकार अस्थिर करायचं आणि त्यानंतर रशिया समर्थक सरकार सत्तेवर आणायचं, असा डाव रशियाचा असू शकतो, असा इशारा ब्रिटननं दिला आहे. अर्थात, यासाठी कुठलेही ठोस पुरावे युकेकडून देण्यात आलेले नाहीत. रशियानं फेटाळले आरोप युके करत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा रशियानं केला आहे. युक्रेन आणि नाटोची जवळीक पाहता सुरक्षेचा उपाय म्हणूनच सैनिक तैनात केले असल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनवरील सायबर हल्ल्यामागे आपला काहीही हात नसल्याचा दावा रशियाने केला असून आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचंही म्हटलं आहे. हे वाचा- युद्धाचे ढग! अमेरिकेनं युक्रेनमध्ये पाठवला मोठा शस्त्रसाठा, रशियाला इशारा काय आहे प्रकरण? नाटो संघटना आपला विस्तार करत चालली असून तो उर्वरित जगासाठी योग्य नसल्याचा दावा रशियाने केला आहे. यासाठी युक्रेनच्या नाटोमधील सहभागाला रशियाने विरोध केला असून तसं झालं तर गंभीर परिणामांना सामोरं जाण्याचा इशारा दिला आहे. युक्रेनचा नाटोत समावेश होणार नाही, असं लेखी आश्वासन देण्याची मागणी रशियानं अमेरिकेकडं केली आहे. तर अमेरिकेनं याला साफ नकार दिला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Russia, Uk, Ukraine news

    पुढील बातम्या