मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

...अन् क्षणात रिकामी झाली आईची कुस, चारही लेकरांचा एकाच वेळी मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

...अन् क्षणात रिकामी झाली आईची कुस, चारही लेकरांचा एकाच वेळी मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

प्रतीकात्मक फोटो (फोटो सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (फोटो सौजन्य - Canva)

जुळ्या मुलांना एकाच वेळी आईने गमावलं आहे.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 20 डिसेंबर : आपल्याला किमान एक तरी मूल असावं, यासाठी कितीतरी दाम्पत्य धडपड करत असतात. काही जणांना तर किती तरी वर्षे मूल झालं नाही तर त्यांना एकाच वेळी जुळ्या मुलांचं सुख मिळतं. त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. अशीच जुळी मुलं एकाच झटक्यात जग सोडून गेली तर त्यापेक्षा मोठं दुःख आईवडिलांसाठी दुसरं कोणतंच नाही. अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे ती लंडनमध्ये. एका महिलेने एकाच वेळी आपल्या चारही मुलांना गमावलं आहे (4 children died in house fire).

27 वर्षांची डेवेका रोस नावाची महिला. जिला चार मुलं होती आणि चारही मुलांचा मृत्यू झाला आहे. तिच्या घरात आग लागली आणि या आगीच्या विळख्यात तिची चारही मुलं सापडली. दुर्दैवाने या चारपैकी एकही मूल वाचलं नाही. सर्वांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. किसन, ब्रायसन, लेटन आणि लोगान अशी या मुलांची नावं. 3 ते 4 वर्षांची ही मुलं होती.

हे वाचा - कुत्रा Vs माकड; 250 पिल्लांच्या हत्येनंतर दोन्ही माकडांना वन विभागाने पकडलं

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार महिलेच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की दुर्घटना झाली तेव्हा महिला घरी नव्हती ती शॉपिंगला गेली होती. तिची चारही मुलं घरात होती.

डेवेका म्हणाली, माझ्या मते, प्लॅस्टिकच्या फ्रंट डोअरला सर्वात आधी आग लागली. त्यानंतर ख्रिसमस ट्रीवरील लाइटमुळे आग संपूर्ण घरात पसरली असावी. त्यानंतर घरात धूरच धूर झाला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 60 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. चारही मुलांना घरातून बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण कुणीच वाचलं नाही.

हे वाचा - कफ सिरप ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू; 16 मुलं पडली आजारी

मुलांबाबत हलगर्जीपणा केल्याने महिलेला पोलिसांनी अटक केली. आता जामिनावर तिची सुटका झाली आहे. एकाचवेळी चारही मुलांचा अंत म्हणजे आईसाठी मोठा धक्काच आहे. डेवेका म्हणाली, माझी मुलं माझं आयुष्य होती, माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. मी कधीच या धक्क्यातून बाहेर पडू शकत नाही. त्या दुर्घटनेलाही विसरू शकत नाही.

First published:

Tags: Fire, Parents and child, Uk, World news