'तुझा हिजाब काढ डोळे पाहू दे', पाकिस्तानातील चीनी अधिकाऱ्याच्या ट्विटनं गदारोळ

'तुझा हिजाब काढ डोळे पाहू दे', पाकिस्तानातील चीनी अधिकाऱ्याच्या ट्विटनं गदारोळ

पाकिस्तानमध्ये (Pakistan) काम करणाऱ्या चीन सरकारमधील अधिकाऱ्याच्या (China Diplomat) ट्विटनं चांगलाच गदोरळ झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 8 मार्च : पाकिस्तानमध्ये (Pakistan) काम करणाऱ्या चीन सरकारमधील अधिकाऱ्याच्या (China Diplomat) ट्विटनं  चांगलाच गदोरळ झाला आहे. या ट्विटचा पाकिस्तानातील धार्मिक पक्षांसह सामान्य नागरिकांनी मोठा विरोध केला आहे. त्यांचं हे ट्विट इस्लामचा अपमान करणारं असल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  (Imran Khan) यांनी या प्रकरणावर योग्य कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये तैनात असलेले चीनी दुतावासातील अधिकारी जेंग हॅकिंग यांनी चीनच्या मुस्लिम बुहुल शिनझियांग ((Xinxiang)  प्रांतामधील एका मुलीचा डान्स करणारा व्हिडीओ ट्विट केला होता. त्या व्हिडीओला त्यांनी, 'तुझा हिजाब काढ मला तुझे डोळे पाहू दे' असं कॅप्शन दिलं होतं. त्यांचं हे ट्विट अगदी कमी कालावधीमध्ये व्हायरल झालं. त्यावर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

चीनमध्ये सातत्याने इस्लामच्या विरोधी काम केलं जातं. त्यावर इम्रान खान सरकार काहीही कारवाई करत नाही, असा आरोप पाकिस्तामच्या नागरिकांनी केला आहे. चीनमधील मुसलमानांची जबरदस्तीनं नसबंदी आणि गर्भपात केला जातो. तसंच त्यांना शिनझियांग प्रांताच्या दूर असलेल्या पश्चिम भागात जबरदस्तीने नेलं जात असल्याचा आरोप आहे.

शिनझियांग प्रांतात अल्पसंख्याक उइगर मुस्लीम आणि हान चिनी लोकांमध्ये वर्षानुवर्षं संघर्ष सुरू आहे. या संघर्षात शेकडो मुस्लीम लोक मारले गेले आहेत. उइगर मुस्लीम लोकांच्या फुटीरवादी कारवायांमुळे चीनमध्ये अशांती आहे, असं चीनचं म्हणणं आहे. तर उइगर मुस्लीम लोकांच्या धर्म आणि संस्कृतीवर चिनी आक्रमण होतं आहे, अशी या मुस्लिमांची तक्रार आहे.

(वाचा - ‘या’देशांनं सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास घातली बंदी, सार्वमतानंतर निर्णय )

या प्रांतामध्ये या अल्पसंख्याक उइगर मुस्लीम लोकांसाठी एक वसाहतच बनवली आहे. या वसाहतीत त्यांना बंदिवासात ठेवण्यात आलं आहे. पण ही वसाहत म्हणजे प्रशिक्षण केंद्र आहे, असा चीनचा दावा आहे.

यापूर्वी शिनजियांगमधील अतुश सुंथग गावात एका मशिदीला (Tokul mosque torn down) सार्वजनिक शौचालय बनविण्यात आलं होतं. तसंच गावातील अनेक मशिदी देखील पाडण्यात आल्या होत्या.

Published by: News18 Desk
First published: March 8, 2021, 4:09 PM IST

ताज्या बातम्या