UBER बुकिंग करताना कमाल, कारने जायचं होतं मिळालं हेलिकॉप्टर

UBER बुकिंग करताना कमाल, कारने जायचं होतं मिळालं हेलिकॉप्टर

हेलिकॉप्टर मिळत असतानासुद्धा तिनं केला कारनं प्रवास कारण...

  • Share this:

न्यूयॉर्क, 27 डिसेंबर: ओला उबर सारख्या ऑनलाइन टॅक्सी अॅपचा वापर हल्ली जास्त होताना दिसत आहे. ही सेवा लोकांच्या जेवढी फायद्याची आहे तेवढंच त्यापासून होणारा त्रासही आहेच. ओला-उबर बुकिंगची वेळ आणि ट्रॅफिकनुसार त्यांचे पैसे लावत असतात. बऱ्याचवेळा त्यांची मनमानी चालते. बऱ्याचदा बूक झालेली कार कॅन्सलही केली जाते. आता तुम्ही कुठे जात असाल आणि तुम्ही ओला-उबर बुक केली मात्र जाण्यासाठी जेवढे पैसे लागतात त्यापेक्षा कमी दरात तुम्हाला हेलिकॉप्टर राईड मिळाली तर? तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? पण हो ओला-उबेर राइडच्या तुलनेत हेलिकॉप्टर राइट फारच स्वस्त मिळत असेल तर कुणाला नको आहे.

असाच प्रकार न्यूयॉर्कमधील एका महिलेसोबत घडला. या महिलेनं उबेर अॅपव्दारे एक कार बुक केली. मात्र त्या कारचं भाडं खूप जास्त होत असल्यानं महिलेनं इतर पर्याय निवडण्याचं ठरवलं. त्यावेळी सर्वात स्वस्त राइड हेलिकॉप्टरची असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार निकाले नावच्या महिलेनं आपल्या घरापासून विमानतळावर जाण्यासाठी उबरची कार बुक केली. त्यावेळी एक्स उबरसाठी निकाले यांनी 126.84 डॉलर द्यावे लागणार होते. पूल कॅबसाठी 102.39 डॉलर द्यावे लागणार होते. यासोबत एक तिसरा पर्यायही उपलब्ध होता तो हेलिकॉप्टरचा. हेलिकॉप्टर बुक केल्यास फक्त 101.39 डॉलर्स द्यावे लागणार होते. म्हणजेच सर्वात स्वस्त राइड ही हेलिकॉप्टरची होती.

हेही वाचा-ट्रेनमध्ये प्रवाशांचे खिसे कापून झाला श्रीमंत, 15 वर्षांपासून जगतोय ऐशोआरामात

निकोल यांनी उबर अॅपचा हा स्क्रीनशॉर्ट काढून ट्विटरवर शेअर केला. या फोटोला जवळपास 7.7 लाख लोकांनी लाइक केलं आहे. तर 1.5 लाख लोकांना शेअर केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर निकोल यांची फिरकी घेतली. तर काही नेटकऱ्यांनी हेलिकॉप्टर निकोल यांना कुठे पिक करेल असं म्हटलं आहे. ट्विटरवर अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर अखेर निकोल यांनी हेलिकॉप्टरपेक्षा कॅबने जाणं पसंत केलं. माझ्याजवळ मोठी बॅग होती. हेलिकॉप्टर राइडसाठी फक्त हातात पकडण्याएवढी बॅग असणं आवश्यक आहे अशी अट असल्यानं राइड कॅन्सल केली. माझ्याकडे मोठी बॅग असल्यानं कॅबने जाण्याचा निर्णय घेतल्याचं निकोल यांनी त्यांच्या एका कमेंटमध्ये सांगितलं. सोशल मीडियावर कॅब राइड ऐवजी हेलिकॉप्टरची सफर स्वस्त असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा-माकडांना बिस्कीट देण्यासाठी घाटात थांबला, तोल जाऊन 200 फूट दरीत कोसळला

Published by: Akshay Shitole
First published: December 27, 2019, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading