सिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल

सिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल

भारतीय सुप्रीम कोर्टाने यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध लादले आहेत. भारतात असे निर्बंध पहिल्यांदाच येत असले तरी इतर देशांमध्ये फटाके फोडण्याचे नियम कडक आहेत.

  • Share this:

सिंगापूर सिटी, ८ नोव्हेंबर (PTI) : बिना परवाना फटाके फोडले म्हणून दिवाळी साजरी करणाऱ्या दोन भारतीयांना सिंगापूरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

थियागु सेल्वराजु (वय 29) आणि शिव कुमार सुब्रमण्यम (वय 48)असं या प्रकरणात अटकेत असणाऱ्या भारतीयांची नावं आहेत.

भारतीय सुप्रीम कोर्टाने यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध लादले आहेत. भारतात असे निर्बंध पहिल्यांदाच येत असले तरी इतर देशांमध्ये फटाके फोडण्याचे नियम कडक आहेत.

सिंगापूरमध्ये फटाके फोडण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करून अशी परवानगी घेता येते. बिना परवाना फटाके फोडले तर या देशात कडक शिक्षा होऊ शकते.

२ भारतीयांना या कायद्याचा फटका सिंगापूरमध्ये बसला. सेल्वराज आण सुब्रमण्यम हे दोघे सोमवारी संध्याकाळी दिवाळी साजरी कऱण्यासाठी एकत्र आले होते. सिंगापूरमधल्या लिटिल इंडिया नावाच्या भागात हा प्रकार घडला.

हे दोघं फटाके फोडतानाच व्हिडिओ फेसबुकवर टाकण्यात आला होता. तो बराच शेअरही झाला होता. त्यानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांनी या दोघांना अटक केली.

२ वर्षांच्या शिक्षेबरोबरच या दोघांना २००० ते १०००० सिंगापूर डॉलर एवढा दंडही होऊ शकतो. १४ नोव्हेंबरला त्यांना पुन्हा कोर्टापुढे उभं करण्यात येणार आहे.

भारतातही फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीरपणे दखल घेत सुप्रीम कोर्टानं यंदा फटाके फोडण्यावर काही निर्बंध घातले आहेत.

रात्री ८ ते १० या वेळातच फटाके फोडायची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. याशिवाय आवाजी फटाक्यावरसुद्धा निर्बंध आहेत.

वकिलांच्या म्हणण्यानुसार फटाक्यांसदर्भात तक्रार आली, तर पोलीस भारतीय दंडविधानाच्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करतात.

हा गुन्हा जामीनपात्र आहे. पण याची केस कोर्टात चालवली जाऊ शकते. गुन्हा सिद्ध झाला तर ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. देशभरात सुप्रीम कोर्टाच्या या नियमाचं उल्लंघन करणारे अनेक जण होते. पण दिल्ली पोलिसांनी हळूहळू असं उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवायला सुरुवात केली आहे.

दिल्लीत अवैध रीतीने फटाके फोडणाऱ्या १०० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नोएडामध्ये ३१ केसेस नोंदल्या गेल्या आहेत. शिवाय दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ४०० किलो फटाके जप्तही केले आहेत.

VIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार

First published: November 8, 2018, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading