न्यूयॉर्क, 6 नोव्हेंबर : अमेरिकेतील डेन्व्हरमधून कोरोना व्हायरसचं (Coronavirus) एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. डेन्व्हर येथील प्राणीसंग्रहालयात 11 सिंह आणि दोन तरसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने (United States Lab) याची पुष्टी केली आहे. डेन्व्हर प्राणीसंग्रहालयातील दोन तरस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तरसांना कोरोनाची लागण झाल्याचं हे जगभरातील पहिलंच प्रकरण आहे.
याबाबत अधिकची माहिती देताना, राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळा (NVSL) ने सांगितले की, प्राणीसंग्रहालयातील अनेक सिंह आजारी पडल्यानंतर, तरसासह अनेक प्राण्यांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. यात तरसांच्या नमुन्यांची कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. जिथे ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तरसांशिवाय 11 सिंह आणि दोन वाघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
So Cute : या दाम्पत्याची अन् चिमणीची आहे अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते
रिपोर्टनुसार, प्राणीसंग्रहालयात अनेक प्राणी आजारी आढळले होते. त्यानंतर सर्वांचे नमुने घेण्यात आले. प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह तरस सध्या पूर्णपणे निरोगी असून त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या नाही. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही कोरोना संक्रमित तरसांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. त्यापैकी एक 22 वर्षांचा तर दुसरा 23 वर्षांचा आहे. दोघांमध्ये थोडीशी सुस्ती तर कधी खोकल्याची समस्याही दिसून येत आहे.
उतावळा नवरदेव! स्टेजवरच आऊट ऑफ कंट्रोल झाला वर; ते कृत्य पाहून नवरीही लाजली, VIDEO
प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळलेले प्राणी पूर्णपणे बरे झाले आहेत किंवा जलद बरे होत आहेत. प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत जे अतिसंवेदनशील आहेत. अशा प्राण्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आम्ही आमच्या सर्व 3000 प्राणी आणि 450 हून अधिक प्रकारच्या प्रजातींची देखभाल आणि काळजी घेत असताना आवश्यक ती खबरदारी घेत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Coronavirus