वॉशिंग्टन, 25 मे : एकीकडे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना काही देशांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली ही सूट सध्या महागात पडताना दिसत आहे. अमेरिकेत (America) तर एका चुकीमुळे तब्बल 140 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील मिसौरी येथे सलूनमधील दोन कर्मचाऱ्यांमुळे तब्बल 140 लोकं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलं आहे. हे दोन्ही कर्मचारी कोरोनाची लक्षणं दिसत असतनाही 8 दिवस काम करत होते, यामुळं आता त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरू आहे.
CNNनं दिलेल्या वृत्तानुसार स्प्रिंगफील्ड हेल्थ डिपार्टमेंटनं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार सलूनमध्ये काम करणाऱ्या अशा दोन हेअरस्टायलिस्टबाबत माहिती मिळाली आहे, ज्यांच्या एका चुकीमुळं तब्बल 140 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रेट क्लिप्स नावाच्या सलूनमधील हे दोन कोरोनाबाधित कर्मचारी आहेत. यांपैकी एकानं 56 ग्राहकांचे तर दुसऱ्यानं 84 ग्राहकांचे केस कापले. एवढेच नाही तर याच सलूनमधील 7 इतर कर्मचारीही कोरोनाबाधित आहेत. या दोघांवर असा आरोप करण्यात आला आहे की, 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्यांनी काम सुरू ठेवलं.
वाचा-कोरोनाची लक्षणं असल्याशिवाय टेस्टिंगच होणार नाही, काय आहे ICMR ची नवी गाईडलाईन
अमेरिकेत कोरोना व्हायरसचा संक्रमण झपाट्याने पसरत आहे. जर याच गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर येत्या काळात मृत्यूचा आकडा तिप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेली मेलमधील एका बातमीनुसार इंपीरियल कॉलेजच्या एका नव्या आकड्यांनुसार अमेरिकेत 24 राज्यांमध्ये अनियंत्रित पद्धतीने कोरोनाचा संक्रमण पसरला आहे.
वाचा-जूनमध्ये दिसणार कोरोनाचा सर्वात धोकादायक टप्पा, तज्ज्ञांनी भारताला दिला इशारा
वाचा-...तर जुलैपर्यंत 21 लाख भारतीयांना होणार कोरोना, तज्ज्ञांनी केलं अलर्ट