Home /News /videsh /

फोटो काढला म्हणून तरुणीची हत्या, ड्रग्जच्या नशेत गुन्हेगारांनी केलं तरुणीचं दफन

फोटो काढला म्हणून तरुणीची हत्या, ड्रग्जच्या नशेत गुन्हेगारांनी केलं तरुणीचं दफन

तरुणीचा शेरा सहन न झाल्याने ड्रग्जच्या नशेत असणाऱ्या दोघांनी तिचा निर्घृण खून करून मृतदेह दफन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    ब्राझील, 8 डिसेंबर: केवळ आपल्यावर काही कमेंट पास (passed comment) केली आणि आपल्या हातातील शस्त्राचा फोटो (Photo of weapon) काढल्याचा राग येऊन ड्र्ग्ज माफियांनी तरुणीचा खून (Murder of young girl) केल्याची घटना घडली आहे. ड्रग्जच्या धुंदीत (Drug addict) असलेल्या तरुणांना आपण काय करत आहोत, याचं भान राहत नाही. त्यांच्या मेंदूवर आणि कृतीवर त्यांचा (No control on brain and mind) कुठलाही ताबा राहत नाही. त्यामुळे नशेच्या भरात आपण नेमकं काय करतो आहोत आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शककात, याची कुठलाही तमा न बाळगता ही मंडळी वाटेल ते करताना दिसतात. कुठल्याही गोष्टीवरून अतीव आनंद होणं आणि कुठल्याही बाबीवरून कमालीचं दुःख होणं, राग येणं अशा भावनांमधून ते जात असतात. त्यात गुन्हेगारी वृत्तीचे ड्रग ऍडिक्ट असतील, तर त्यांना गंभीर गुन्हा करण्यासाठी एखादं किरकोळ निमित्तदेखील पुरतं. ब्राझीलमध्ये ड्रग्जच्या नशेत दोन तरुणांनी असंच कृत्य करत एका निष्पाप तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कमेंटमुळे आला राग ब्राझील हा देश ड्रग्ज तस्करी आणि त्यावरून होणारी गुंडगिरी यासाठीदेखील ओळखला जातो. ब्राझीलमध्ये ड्रग्ज तस्करांकडून होणारे गुन्हे ही काही नवी बाब राहिलेली नाही. ब्राझीलमध्ये राहणारी 21 वर्षांची अमांडा अल्बाच नावाची तरुणी ड्रग्ज तस्करांची शिकार ठरली आहे. घटनेच्या दिवशी अमांडा एका पार्टीवरून घरी जात होती. त्यावेळी एका समुद्रकिनारी उभ्या असणाऱ्या दोन तरुणांनी तिच्यावर काही कमेंट केली. त्याला तिनं उत्तर दिलं आणि त्यांचा एक फोटो काढला. त्यापैकी एकाच्या हातात शस्त्र होतं आणि त्याची तक्रार पोलिसांत करण्याच्या उद्देशानं  अमांडानं त्यांचा फोटो काढला. या बाबीचा त्यांना भयंकर राग आला आणि अमांडावर हल्ला करत तिचा बळी घेतला. हे वाचा - खोदायला लावली कबर अमांडाला ठार करण्यापूर्वी दोघांनी तिला स्वतःसाठीच कबर खोदायला लावली आणि त्यानंतर तिचा खून केला. मात्र खून होण्यापूर्वी तिने काढलेला फोटो आणि समुद्रकिनारी आढळलेलं शेवटचं लोकेशन या आधारे पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध लावला. दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Brazil, Crime, Murder

    पुढील बातम्या