Home /News /videsh /

मोठी बातमी: काबुलमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट, दोन जण ठार; शोकसभा सुरू असतानाच झाला धमाका

मोठी बातमी: काबुलमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट, दोन जण ठार; शोकसभा सुरू असतानाच झाला धमाका

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका मशिदीबाहेर (Two died in bomb blast in mosque in Kabul) झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले आहेत.

    काबुल, 3 ऑक्टोबर : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका मशिदीबाहेर (Two died in bomb blast in mosque in Kabul) झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले आहेत. तालिबाननं दिलेल्या माहितीनुसार एका मशिदीत श्रद्धांजली सभा सुरु (Blast during condolences meeting) असताना हा स्फोट झाला. एका तालिबानी नेत्याच्या आईच्या निधनानंतर सुरु असणाऱ्या शोकसभेदरम्यान जोरदार धमाका घडवण्यात आला. यात आतापर्यंत दोन जण ठार झाल्याची माहिती आहे. असा झाला स्फोट अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तालिबानविरोधी दहशतवादी गट सक्रीय झाले आहेत. काही ना काही कुरापती करून तालिबानला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न या संघटना करत आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. काबुलच्या ईदगाह मशिदीत तालिबानी प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद  यांच्या आईची शोकसभा सुरु होती. तालिबानशी संबंधित अनेक नागरिक या सभेत उपस्थित होते. प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया मशिदीतून स्फोटाचा जोरदार आणि धमाकेदार आवाज ऐकू आल्याची प्रतिक्रिया या मशिदीच्या परिसरातील दुकानदारांनी दिली आहे. अगोदर स्फोटाचे आणि त्यानंतर गोळीबाराचेही काही आवाज ऐकू आले. स्फोटानंतर तातडीने हा रस्ता ब्लॉक करण्यात आला. अनेक ऍब्युलन्स या ठिकाणी दाखल झाल्या आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. या स्फोटात आतापर्यंत दोन जण ठार झाले आहेत, तर अनेकजण जखमी आहेत. हे वाचा - दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर झळकली महात्मा गांधींची प्रतिमा, VIDEO होतोय VIRAL ‘आयसीस-खुरासान’वर संशय या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. मात्र आयसीस खुरासान या संस्थेनंच हा धमाका घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालिबानचं सरकार अफगाणिस्तानमध्ये आल्यापासून ही संघटना सक्रीय झाली आहे. तालिबान इस्लाम आणि जिहादविरोधी असून त्यांची सत्ता उलथवून लावण्याच्या उद्देशाने आयसीस-खुरासान ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. त्यामुळे या संघटनेकडून आतापर्यंत अनेक स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. तालिबानची सत्ता  खिळखिळी करणं, हा आयसीस-खुरासान संघटनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचे बळी जात आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Bomb Blast, Taliban

    पुढील बातम्या