मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मोठी बातमी! 2 लढाऊ चॉपरची हवेत धडक, वैमानिकासह 15 लोकांचा मृत्यू

मोठी बातमी! 2 लढाऊ चॉपरची हवेत धडक, वैमानिकासह 15 लोकांचा मृत्यू

सैन्याचे हेलिकॉप्टर खाली कोसळल्याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी

  • Published by:  Kranti Kanetkar

काबुल, 14 ऑक्टोबर : सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सैन्याच्या दोन विमानांची धडक झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या दक्षिणी हेलमंदमधील नवा जिल्ह्यात अफगाणिस्तानच्या हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या अपघातामुळे किमान 15 जणांचा मृत्यू झाला.

सैन्याचे हेलिकॉप्टर खाली कोसळल्याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं हा अपघात घडला का? या अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही. या प्रकरणी जखमींचा देखील आकडा अद्याप समोर आला नाही. सध्या या ठिकाणी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

First published: