मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकनं 170 कोटींच्या टेस्ला कंपनीला दिले निमंत्रण, लोकांनी काढली लाज

भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकनं 170 कोटींच्या टेस्ला कंपनीला दिले निमंत्रण, लोकांनी काढली लाज

इलॉनला आपल्या देशात बोलवण्यासाठी सर्वच देश धडपडत असताना पाकनं एक अजब निमंत्रण मस्कला पाठवले आहे.

इलॉनला आपल्या देशात बोलवण्यासाठी सर्वच देश धडपडत असताना पाकनं एक अजब निमंत्रण मस्कला पाठवले आहे.

इलॉनला आपल्या देशात बोलवण्यासाठी सर्वच देश धडपडत असताना पाकनं एक अजब निमंत्रण मस्कला पाठवले आहे.

कराची, 06 जानेवारी : जगातील सर्वात महागडी अशी टेस्ला गाडी तयार करणाऱ्या कंपनीची मालक इलॉन मस्क नेहमीच आपल्या संपत्तीमुळे चर्चेत असतो. असे म्हटले जाते की इलॉन मस्कची वार्षिक कमाई ही 170 कोटींच्याही वर आहे. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'सारख्या नवतंत्रज्ञानाने सर्व सामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्याची स्वप्नं पाहणारे ख्यातनाम तंत्रज्ञ म्हणूनही इलॉन मस्कची ओळख आहे. याच इलॉनला आपल्या देशात बोलवण्यासाठी सर्वच देश धडपडत असताना पाकनं एक अजब निमंत्रण मस्कला पाठवले आहे.

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री फवाद हुसेन यांनी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी इलॉन मस्कला आपल्या देशात आमंत्रित केले. मात्र ट्विटरवर फवाद हुसेन यांनाच ट्रोल करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी फवाद यांना आधी तुमच्या देशात वीज आहे का बघा, असे म्हणज ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.अल अरेबिया इंग्लिश या वृत्तसंस्थेने असे ट्वीट केले होते की, इलॉन मस्कची कंपनी टेस्ला वर्षाकाठी दीड दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने बनविण्याचा विचार करीत आहे. टेस्लाच्या उच्च-अंतातील इलेक्ट्रिक वाहने चालविण्यासाठी पुढील संभाव्य जमीन म्हणून फवादने पाकिस्तानला मस्कला आमंत्रित करण्याचे ठरवले.

वाचा-टाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO

फवाद यांनी, “प्रिय इलॉन मस्क तुमची पुढची गुंतवणूक पाकमध्ये होऊ शकते,” असे ट्वीट करत पुढच्या प्रकल्पात टेस्लाने पाकिस्तानला का जावे याची कारणेही दिली. फवाद म्हणाले की, “पाकिस्तान दहा वर्षांसाठी टेस्लाच्या कारखान्यासाठी सानुकूल मुक्त आयात करेल. माझा दावा आहे की इतर कोणत्याही देशाकडून ही ऑफर केली जात नाही”. फवाद एवढ्यावरच थांबले नाही तर पाकिस्तान हा तिसरा सर्वात मोठा स्वतंत्र सॉफ्टवेअर निर्यातदार असल्याचा दावाही त्यांनी केला.

वाचा-36 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्या फोनमध्ये करावं लागेल 'हे' काम

वाचा-बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप

दरम्यान फवाद यांच्या ट्वीटवर त्यांना ट्रोल करण्यात आले. टेस्ला हे कपड्यांचे दुकान नसल्याचेही एक युझरने म्हटले आहे.

वाचा-VIDEO : नेहा पेंडसेनं लग्नात घेतला असा भन्नाट उखाणा की, ऐकून नवराही लाजला

फवाद यांच्या आमंत्रणाला इलॉन मस्क यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published: