मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मोठी बातमी! ओबामा, बिल गेट्स, नेतन्याहूंसह अनेक दिग्गजांचे ट्विटर हॅक

मोठी बातमी! ओबामा, बिल गेट्स, नेतन्याहूंसह अनेक दिग्गजांचे ट्विटर हॅक

अॅपल, उबर आणि बर्‍याच कंपन्यांच्या खात्यातूनही बिटकॉइन घोटाळ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अॅपल, उबर आणि बर्‍याच कंपन्यांच्या खात्यातूनही बिटकॉइन घोटाळ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अॅपल, उबर आणि बर्‍याच कंपन्यांच्या खात्यातूनही बिटकॉइन घोटाळ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 16 जुलै: हॅकर्सने आता नेते, व्यावसायिक आणि बड्या व्यक्तींच्या ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये यात अमेरिकन नेते जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि Appleमधील बरीच महत्त्वाची ट्वीटर अकाऊंट आहेत. ट्विटर हँडल हॅक झाल्यावर त्यावर एक खास मेसेज पोस्ट करण्यात आला. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं ट्विटर हँडलही हॅक करण्यात आलं. हे संदेश क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या उद्देशाने केल्याचं समोर आलं आहे. या मेसेजला काही वेळानं ट्वीटर हँडलवरून हटवण्यातही आलं होतं.

हॅकर्सने एका ट्वीट केलं आहे. मला बिटकॉइन्स द्या आणि मी तुम्हाला ते दुप्पट करून देईन. ही ऑफर केवळ 30 मिनिटांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही एक हजार डॉलर्स पाठवा आणि मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स करून देईन. ही पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये ट्वीट अकाऊंटवरून हटवण्यात आलं. या व्यक्तींच्या अकाऊंटवर हा मेसेज कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

अॅपल, उबर आणि बर्‍याच कंपन्यांच्या खात्यातूनही बिटकॉइन घोटाळ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनंतर ट्विटरच्या सिक्युरिटीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

ट्विटरने या प्रकरणी माहिती दिली असून सध्या याबाबत काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या नेत्यांच्या ट्विटर हँडल हॅक कसे करण्यात आले याचा तपास सुरू असल्याची माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos