न्यूयॉर्क, 09 एप्रिल : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या सर्व देश एकत्र आले आहेत. यासाठी जगातली अरबपतीही मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सीने कोरोनाच्या लढाईत आतापर्यंतची सर्वात जास्त रक्कम दान केली आहे. जॅन डोर्सीने 7 हजार 500 कोटी दाम केले आहे. डोर्सी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
डोर्सी यांनी दान केलेली रक्कम ही त्यांच्या एकूण मालमत्तेच्या 28% आहे. संपूर्ण रक्कम त्यांच्या चॅरिटी फंड स्टार्ट स्मॉल एलएलसीमध्ये जाईल. ही रक्कम देणगी त्याच्या डिजिटल पेमेंट ग्रुप स्क्वेअर इंकद्वारे देण्यात येईल. या रकमेचा उपयोग मुलींचे आरोग्य आणि शिक्षणासाठी आणि 'युनिव्हर्सल बेसिक इनकम'साठी केला जाणार आहे.
वाचा-हॉटस्पॉट भागात राहणारे लोक काय करू शकतात आणि काय नाही? जाणून घ्या सर्व माहिती
डोर्सी यांनी ट्विट करत, 'आता का? त्वरित मदतीची आवश्यकता आहे आणि मला याचे परिणाम आयुष्यभर पाहायचे आहेत. मला आशा आहे की यामुळे इतरांनाही असे करण्याची प्रेरणा मिळेल. आयुष्य खूपच लहान आहे, म्हणूनच लोकांच्या मदतीसाठी आपण शक्य तितके सर्व करू', असे आवाहनही केले.
I’m moving $1B of my Square equity (~28% of my wealth) to #startsmall LLC to fund global COVID-19 relief. After we disarm this pandemic, the focus will shift to girl’s health and education, and UBI. It will operate transparently, all flows tracked here: https://t.co/hVkUczDQmz
— jack (@jack) April 7, 2020
वाचा-लोकांच्या जीवाशी का खेळतोय चीन? आणखी एका देशाला पाठवले 60 हजार नकली मास्क
स्क्वेअर इंकची निवड का केली?
'फोर्ब्स' मासिकाने डोर्सीची एकूण मालमत्ता 24 हजार 750 कोटी आहे. कंपनीत त्याचा जास्त हिस्सा असल्याने त्याने देणगी देण्यासाठी ट्विटरऐवजी स्क्वेअरचा हिस्सा निवडला आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 82 हजारहून जास्त मृत्यू झाला आहे, तर 14 लाखहून अधिल लोकांना संसर्ग झाला आहे.
वाचा-कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार होईपर्यंत भारतात मृतांचा आकडा आहे सगळ्यात जास्त
या अमेरिकन अब्जाधीशांनीही मोठी देणगी दिली
फेसबुकचे संस्थापकमार्क झुकरबर्ग यांनी 227 कोटींची मदत केली आहे. झुकरबर्गने दिलेली रक्कम कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केली जाईल. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी कोरोना व्हायरस संकटातील गरीब आणि अन्नाची कमतरता असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी 10 कोटी डॉलरची मदत जाहीर केली. तर अॅपलचे मुख्य कार्यकारी टिम कुक यांनी मार्चमध्ये घोषणा केली होती की ही कंपनी इटलीला या विषाणूमुळे ग्रस्त झालेल्या वैद्यकीय साहित्याची देणगी देईल.