Home /News /videsh /

बापरे! 20 मांजरींनी मिळून मालकिणीचं अर्ध शरीर खाल्लं; 2 आठवड्यांपर्यंत असंच भरत राहिले पोट

बापरे! 20 मांजरींनी मिळून मालकिणीचं अर्ध शरीर खाल्लं; 2 आठवड्यांपर्यंत असंच भरत राहिले पोट

ही भयंकर बातमी वाचल्यानंतर कोणालाही धक्काच बसेल. परंतू ही घटना प्रत्यक्षात घडली आहे.

    नवी दिल्ली, 18 जून : रशियातील बटायस्कमधील एका महिलेचं अर्धं शरीर 20 मांजरानी (Cats) खाल्लं आहे. तब्बल दोन आठवड्यांनंतर वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या मृत्यूनंतर घरातील मांजरं ही उपाशी होती. त्यामुळे त्यांनी या मृत महिलेचंच मांस खाल्लं. खरं तर मांजर हे खूप गोंडस असतं, त्याचा लळाही सर्वांना लागतो, घरातील ते एक सदस्यच बनलेलं असत. असं असले तरी प्राणी हे प्राणीच असतात. पोटाचा प्रश्न येतो तेव्हा कोणीही कोणाचं नसतं, मग तो माणूस असो की प्राणी. ते कधी आक्रमत बनतील हे सांगता येत नाही. असाच प्रकार त्या मांजरांच्या बाबतीत घडला आणि मांजरांनी आपल्या मालकिणीलाच आहार बनवलं. रशियातील बटायस्क शहरात एका महिलेला तिच्या 20 मांजरींनी एकत्र खाल्ल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षात महिलेच्या मृत्यूनंतर घरातील मांजरं उपाशी होती. त्यामुळे जे मिळेल ते खाऊन ती पोट भरू लागली. मृत महिला ही मांजर पाळणारी होती. मालकिणीच्या मृत्यूनंतर सुरु झाला प्रकार शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेच्या घरात प्रवेश केल्यावर आतील दृश्य हे थरकाप उडवणारं होतं, मृत महिलेच्या अस्ताव्यस्त झालेल्या शरीरावर सुमारे 20 मांजरं बसली होती. आजूबाजूला रक्ताचं थारोळं साचलं होतं, मांजरांची तोंडंही लाल होती. मांजरांनी महिलेचं अर्धं शरीर खाल्लं होतंच शिवाय उरलेलं शरीरही खाण्याच्या तयारीत ती होती. विशेष म्हणजे, ज्या मांजरानी मालकिणीचं शरीर खाल्लं ती अमेरिकेतील सर्वात जेंटल ब्रीड (Gental Breed) म्हणजेच सभ्य जातीची मांजरं मानली जातत. ज्यांचे नाव `मेन कून कॅट्स' आहे. ती खूप प्रशस्त आणि धडधाकड असतात. आणि स्वभावानेही खूप शांत असतात. पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर मेन कून मांजरे ही त्यांच्या मोठ्या आकारासाठी ओळखली जातात. ती अत्यंत लोकप्रिय जात आहे, जी सध्या जागतिक पाळीव मांजरांच्या (Pet Cats) लोकप्रियतेच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ही मांजरं त्यांच्या निष्क्रिय स्वभावासाठीही ओळखली जातात. त्यांना `जेंटल जायंट्स'ही (Gental Jayants) म्हणतात. तरीही त्यांनी ही सर्वांत क्रूर गोष्ट का केली असावी? बाबत प्राणी बचाव तज्ज्ञाने सांगितलं की, मांजरांना दोन आठवडे एकटं सोडलं गेलं. वास्तविक, दोन आठवड्यांपूर्वी मालकिणीचा मृत्यू झाला आणि ती घराच्या आत जमिनीवर पडली होती. त्यामुळे मांजरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. अशा स्थितीत भूक शमवण्यासाठी समोर जे उपलब्ध होते, ते पोट भरून त्यांनी स्वतःला जिवंत ठेवलं. याआधीही जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

    First published:

    Tags: Cat, Pet animal, Russia

    पुढील बातम्या