बलुचिस्तान, 07 जानेवारी : कारागृह म्हंटल की चेहऱ्यासमोर येते ती काळोख असलेली खोली आणि किळसवाणं जीवन. मात्र जर तुम्हाला कळलं की काही आरोपी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्यासारखे जगत आहेत तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र असा प्रकार घडला आहे. एका आरोपीनं तुरूंगातच 25 टीव्ही आणि 300 मोबाईल जमा केले होते.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा जिल्हा कारागृहात कैद्यांकडून 25 टीव्ही सेट, 300 मोबाइल फोन, ड्रग्ज (अंमली पदार्थ) आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. द न्यूज इंटरनेशनलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी तुरूंगात टाकलेल्या छाप्यात या वस्तू सापडल्या.
वाचा-सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; इतिहासात पहिल्यादाच सोन्याने गाठली एवढी उंचीवाचा-पिझ्झा बेक होता होता त्याखाली शिजला साप! ओव्हन उघडल्यानंतर बेशुद्ध झाली तरुणी
एवढेच नाही तर एखाद्या घराप्रमाणे कारागृहातून स्टोव्ह व भांडीही होती. पोलिसांनी ही भांडीही जप्त केली आहेत. द न्यूज इंटरनेशनलने दिलेल्या माहितीनुसार, तुरूंगात कैद्यांना त्यांचे आवडते खाद्य दिले जात होते, असेही उघडकीस आले आहे.
वाचा-घरात ठेवलेल्या सोन्यावर आहे बँकांची नजर, मोदी सरकारचे नवे आदेशवाचा-अभिनेत्रीचा खुलासा, ‘65 वर्षीय प्रोड्युसरनं मला कपडे उतरवण्यास सांगितलं'
मुख्य म्हणजे, कैदी आत मोबाइल फोन आणि आवडीचे पदार्थ खात असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. बर्याच जणांकडून मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. एक कैदी हॉटेमध्ये राहत असल्याप्रमाणे क्रिकेटचे सामने पाहायचा आणि बातम्याही बघायचा. पोलिसांनी सर्व सामान जप्त केला असून पुढील कारवाई केली जात आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.