मुंबई, 26 एप्रिल : जगातील अनेक मंडळींना आपल्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम असतं. त्याची अनेक उदाहरण आहेत. ही मंडळी वैयक्तिक पातळीवर आपल्या या प्रेमासाठी वेगवेगळे उद्योग करत असतात. तुर्केमेनिस्तान (Turkmenistan) या देशानं याबाबतीमध्ये आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे. त्यांनी चक्क अल्बे (Alabai Dog Breed) या स्थानिक कुत्र्याच्या प्रजातीच्या सन्मानासाठी चक्क राष्ट्रीय सुट्टी (National Holiday) साजरी केली. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही सुट्टी साजरी करण्यात आली. यापूर्वी या देशात या कुत्र्याची सोन्याची मूर्ती बनवण्यात आली असून त्यांच्या राष्ट्रपतींनी यावर एक पुस्तक देखील लिहलं आहे.
अल्बे प्रजातीच्या या कुत्र्याचा समावेश तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रीय वारश्यामध्ये होतो. याच्या सन्मानार्थ एक विशेष दिवस देखील साजरा करण्यात येतो. त्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. तुर्केमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरुबांगुली बेर्डीमुखामदेव (Gurbanguly Berdymukhamedov) यांनी या कुत्र्याचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव देखील केला आहे.
सुमारे 60 लाख लोकसंख्या असलेल्या या देशावर बेर्डीमुखामदेव यांची 2007 पासून सत्ता आहे. त्यांनी अल्बे प्रजातीच्या कुत्र्यावर 272 पानांचं पुस्तक लिहलं आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 2017 साली या प्रजातीच्या कुत्र्याचं एक पिल्लू देखील भेट दिलं होतं.
तुर्केमिनिस्तानची राजधानी अशगबात इथं या कुत्र्याची 50 फुट उंच पुतळा बनवण्यात आला असून त्यावर 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 साली या पुतळ्याचं आनावरण करण्यात आले होते. अध्यक्षांनी स्वत:ची देखील एक सोन्याची मुर्ती यापूर्वीच बनवली आहे.
15 वर्षे नोकरीला मारली दांडी; तरीही खात्यात जमा झाला 5 कोटी रुपये पगार
तुर्केमेनिस्तानचे अध्यक्ष स्वत:वर आणि आवडत्या कुत्र्यावर मोठा पैसा खर्च करत असले तरी त्या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. देशातील बहुसंख्य जनता ही गरीब आहे. या देशात तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. या विक्रीमधून मिळणाऱ्या संपत्तीचा फायदा एका ठराविक वर्गापर्यंतच मर्यादीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, World news