Home /News /videsh /

राष्ट्रपतींच्या अवमानप्रकरणी पत्रकार तुरुंगात, 'हा' शब्द पडला महागात

राष्ट्रपतींच्या अवमानप्रकरणी पत्रकार तुरुंगात, 'हा' शब्द पडला महागात

रिपोर्टिंग करताना देशाच्या राष्ट्रपतींविरुद्ध अपशब्द उच्चारल्याप्रकरणी महिला पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

    इस्तंबुल, 23 जानेवारी: एका महिला पत्रकाराने (Female Journalist) राष्ट्रपतींना (President) उद्देशून बोललेले काही शब्द अपमानजनक (Insult) असल्याचं कारण देत त्यांना अटक करण्यात आली आहे. टर्कीचे (Turkey) राष्ट्रपती रिसेप तय्यीप एड्रोगन (Recep Tayyip Edrogan)  यांचा अवमान केल्याप्रकरणी सीडेफ कबास (Sefef Kabas) नावाच्या 53 वर्षांच्या महिला पत्रकाराला पोलिसांनी अटक केली. देशाच्या राष्ट्रपतींचा उल्लेख करताना OX म्हणजेच बैल असा उल्लेख केल्याने यंत्रणा खवळली आणि पत्रकार सीडेफ यांना तातडीनं अटक करण्यात आली. टीव्हीवर वापरले अपशब्द टेलिव्हिजनवर रिपोर्टिंग करत असताना पत्रकार सीडेफ यांनी राष्ट्रपतींवर कडाडून टीका केली. देशातील काही प्रश्नांवर भाष्य करत असताना त्यांची जीभ घसरली आणि देशाच्या राष्ट्रपतींबाबत त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला. या उल्लेखाची देशभर जोरदार चर्चा झाली आणि हे प्रकरण चांगलंच गाजलं राष्ट्रपतींचा अवमान राष्ट्रपती तय्यीप एड्रोगन यांचा अपमान केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना शिक्षा भोगावी लागली आहे. एड्रेगन हे 2014 सालापासून टर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यापूर्वी एक दशक ते टर्कीचे पंतप्रधान होते. टर्कीच्या राजकारणातील एक बडं प्रस्थ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्यावर झालेली टीका ही देशावरील टीका आहे, असं सांगत प्रशासनानं ही कारवाई केली आहे. सत्ताधारी विरोधक आमनेसामने या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीका केलेलं त्यांना सहन होत नसल्यामुळे पत्रकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. देशातील कायदा आणि सुव्यस्थेसह इतर अनेक प्रश्नांवर सरकारला जाब विचारणाऱ्या माध्यमांवर कारवाई करून सरकार दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयानेदेखील गुन्हा दाखल केला असून पत्रकार सीडेफ यांच्याविरुद्ध खटला उभा राहिला आहे. हे वाचा-धक्कादायक! आधी हत्या, मग भाजीसोबत शिजवून खाल्लं शेतकऱ्याचं हृदय अन् जीभ पत्रकारावर कारवाई सीडेफ या गेल्या तीन दशकांपासून पत्रकारितेत असून त्यांनी टीव्हीवर अनेक डिबेट शोचं सूत्रसंचालन केलं आहे. त्यांना इस्तंबूलमधील त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Turkey

    पुढील बातम्या