Home /News /videsh /

कोरोनानंतर त्सुनामीचे संकट! अलास्काच्या किनाऱ्यावर 7.5 तीव्रतेचा भूकंप, अलर्ट जारी

कोरोनानंतर त्सुनामीचे संकट! अलास्काच्या किनाऱ्यावर 7.5 तीव्रतेचा भूकंप, अलर्ट जारी

अलास्काच्या किनाऱ्यावर 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला ज्यामुळे लोक सुरक्षित ठिकाणी रवाना झाले.

    अलास्का, 20 ऑक्टोबर : एकीकडे कोरोनाची संपूर्ण जग दोन हात करत असताना आता त्सुनामीचा धोका आला आहे. सोमवारी अलास्काच्या किनाऱ्यावर 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला ज्यामुळे लोक सुरक्षित ठिकाणी रवाना झाले. काही ठिकाणी 1.5 ते 2 फूट उंच त्सुनामीच्या लाटा देखील आल्या. त्यानंतर लोकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा भूकंप जमिनीपासून 41किमी खाली सॅड पॉइंट शहरापासून 94 किमी अंतरावर झाला.केनेडी प्रवेशद्वारापासून युनिमॅक पासकडे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. नॅशनल ओशएनिक अँड अटमॉस्फीरिक अॅडमिनिस्टेशननं (NOAA) सांगितले की, सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला. अलास्का भूकंप केंद्राच्या मते, पहिल्या भूकंपानंतर आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता 5 पेक्षा जास्त होती. बाधित लोकांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने लोकांना इशारा दिला आहे की मोठ्या लाटा आणि प्रवाहाचा त्यांच्या जवळच्या किनाऱ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याच आले आहेत. तसेच उंचीवर असलेल्या झोनमध्ये जाण्यास सांगितले आहे. यानंतर लोक सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. सॅंड पॉईंटच्या काही ठिकाणी त्सुनामीच्या छोट्या लाटा दिसल्या. दरम्यान, NOAAने हा इशारा सल्लागारात बदलला आहे. त्याचबरोबर त्सुनामीच्या लाटेमुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता नसल्याची माहिती देण्यात आली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या