Earthquake in Alaska: अलास्कामध्ये 7.8 तीव्रतेचा भीषण भूकंप, त्सुनामीचा अलर्ट जारी

Earthquake in Alaska: अलास्कामध्ये 7.8 तीव्रतेचा भीषण भूकंप, त्सुनामीचा अलर्ट जारी

लोकांना समुद्राच्या क्षेत्रापासून काही मैलांवर रहाण्यास सांगितले गेले आहे, कारण त्सुनामीच्या लाटा काही मिनिटांत कित्येक किलोमीटरवर पोहोचू शकतात.

  • Share this:

अलास्का, 22 जुलै : अलास्का पेन्सुला (Earthquake in Alaska) येथे आज तब्बल 7.8 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपानंतर केंद्राभोवती 300 किलोमीटरपर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, या भूकंपाचे केंद्र पेर्विलपासून 60 मैलांच्या अंतरावर तर अँकरोरेजपासून 500 मैलांच्या अंतरावर होते.

त्सुनामी सेंटरच्या मते, भूकंपाचे केंद्रबिंदू चिग्निक शहराच्या दक्षिणेस 75 किलोमीटर अंतरावर होते. सँड पॉइंट, कोल्ड बे आणि कोडियाकच्या समुद्र भागात उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय त्सुनामी केंद्रानेही या भागासाठी विशेष बुलेटिन जारी केले आहे.

लोकांना देण्यात आला इशारा

त्सुनामी सेंटरने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीच्या माहितीच्या आधारे त्सुनामीचा इशारा देण्यात येत आहे. हे नंतर बदलले जाऊ शकते. लोकांना समुद्राच्या क्षेत्रापासून काही मैलांवर रहाण्यास सांगितले गेले आहे, कारण त्सुनामीच्या लाटा काही मिनिटांत कित्येक किलोमीटरवर पोहोचू शकतात.

Published by: Priyanka Gawde
First published: July 22, 2020, 1:44 PM IST
Tags: earthquake

ताज्या बातम्या