News18 Lokmat

इंडोनेशियात त्सुनामी, बीचवर परफॉर्मन्स सुरू असतानाच रॉक बँड गेला वाहून

या त्सुनामीमध्ये 168 जणांचा मृत्यू तर 745 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 23, 2018 04:17 PM IST

इंडोनेशियात त्सुनामी, बीचवर परफॉर्मन्स सुरू असतानाच रॉक बँड गेला वाहून

जकार्ता,23 डिसेंबर :  इंडोनेशियाच्या बांटेन इथल्या सेरांग समुद्रकिनाऱ्याला त्सुनामीचा फटका बसलाय. या त्सुनामीमध्ये 168 जणांचा मृत्यू तर 745 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या त्सुनामीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. एका बीचवर 'सेव्हंटीन' या रॉक बँडचा कार्यक्रम सुरू होता. त्यांचा परफॉम्सन्स सुरू असतानाच त्सुनामीच्या लाटांनी या रॉक बँडला गिळंकृत केलं. या बँडमधल्या दोन सदस्यांचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता आहेत.
दरम्यान, स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता त्सुनामीचा तडाखा बसला. ज्वालामुखी फुटल्यामुळं त्सुनामी आल्याचा अंदाज वर्तवला जात असून अनेक इमारती कोसळल्या असून समुद्रातून बऱ्याच बोटी देखील बेपत्ता झाल्यात. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या.

Loading...


त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केल्याचं सांगितलं जातंय. समुद्रात 15 ते 20 फुट उंच लाटा उसळल्या होत्या असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्सुनामीचा सर्वाधिक फटका पेनदेंगलेग, सेरांग, आणि दक्षिण लाम्पुंग परिसराला बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...