मराठी बातम्या /बातम्या /विदेश /VIRAL PHOTOS: लाल रक्ताच्या पुराचे भयंकर फोटो व्हायरल, काय आहे सत्य?

VIRAL PHOTOS: लाल रक्ताच्या पुराचे भयंकर फोटो व्हायरल, काय आहे सत्य?

एका गावात लाल रक्ताचा पूर आल्याचे काही फोटो ट्वीटरवर व्हायरल होतं आहेत. या घटनेमागंच सत्य आता समोर आलं आहे.

एका गावात लाल रक्ताचा पूर आल्याचे काही फोटो ट्वीटरवर व्हायरल होतं आहेत. या घटनेमागंच सत्य आता समोर आलं आहे.

एका गावात लाल रक्ताचा पूर आल्याचे काही फोटो ट्वीटरवर व्हायरल होतं आहेत. या घटनेमागंच सत्य आता समोर आलं आहे.

नवी दिल्ली 7 फेब्रुवारी : इंडोनेशियामधील (Indonesia) पेकलोंगान शहराच्या दक्षिणेकडील गावाताले काही फोटो आणि व्हिडिओ ट्वीटरवर अपलोड केले गेले आहेत. गावात पूर आल्याचं यात दाखवलं गेलं. धक्कादायक बाब म्हणजे, या पाण्याचा रंग लाल(Red Flood) होता. शेअर करणाऱ्यांनी हे रक्त असल्याचं सांगितलं. हे फोटो ट्वीटरवर (Social Media) हजारो लोकांनी शेअर केले. एका ट्वीटर यूजरनं म्हटलं, की हे फोटो भीती पसरवणाऱ्या लोकांच्या हाती लागले तर? मला खूप भीती वाटते. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यानं म्हटलं, की रक्ताचा हा पाऊस जगाच्या अंताचा संकेत देणारा आहे.

दुसऱ्या एका ट्वीटर यूजरनं म्हटलं, की ते याच भागातील रहिवासी आहे. ते म्हणाले, की कधी कधी रस्त्यावर जांभळ्या रंगाचं पाणीही दिसतं. यूजरच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, पेकलोंगान एक असं शहर आहे, जिथं कपड्यांच्या रंगाचं आणि प्रिंटींगचं काम केलं जात. इथे इंडोनेशियाच्या पारंपारिक पद्धतीनं कपडे रंगवले जाता. पाणी रंगीत होणं, ही इथल्या लोकांसाठी अत्यंत सामान्य गोष्ट आहे.

पेकलोंगनच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डिमास अरगा युधा यांनी सांगितलं, की हे फोटो खरे आहेत. मात्र, पाण्याला आलेला हा लाल रंग रक्ताचा नसून तो कपड्यांच्या रंगाचा आहे. पावसाच्या पाण्यासोबत मिसळला गेल्यानंतर तो पुन्हा एकदा गायब होईल. अरगा युधा म्हणाले, की पाण्याचं रंगीत होणं इथल्या लोकांसाठी खूप सामान्य गोष्ट आहे. मागील महिन्यातच शहराच्या उत्तरेकडील गावांमध्ये हिरव्या रंगाचा पाण्याचा पूर आला होता.

First published:
top videos

    Tags: Rain flood