ट्रम्प यांचा चीनला आणखी एक दणका; व्यापारासंबंधाबाबत दिला इशारा

ट्रम्प यांचा चीनला आणखी एक दणका; व्यापारासंबंधाबाबत दिला इशारा

अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) द्वारा लावलेल्या बंदीविरोधात चीनचा व्हिडीओ अॅप टिकटॉक (TikTok) कायदेशीर कारवाई (Legal Action Against Trump) करण्याची तयारी करीत आहे.

  • Share this:

वाशिंग्टन, 23 ऑगस्ट : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी प्रसारित एका फॉक्स न्यूजवर अमेरिकेच्या  अर्थव्यवस्थेला (America's Economy) चीन (Separate With Chinese Economy) पासून लांब करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली. चीन अमेरिकेतील वस्तूंचा एक प्रमुख खरेदीदार आहे. ट्रम्पने सुरुवातीला मुलाखतकार स्टीव हिल्टनला सांगितले की आम्हाला चीनसोबत व्यापार करायचा नाही आणि त्यानंतर वेगळं होण्याबाबत वक्तव्य करु लागले.

अमेरिकेसोबत चीनचा व्यवहार चांगला नाही- ट्रम्प

त्यांनी सांगितले की जर चीन अमेरिकेसोबत योग्य प्रकारे व्यवहार करीत नाही, तर ते निश्चितपण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. जानेवारी महिन्यात अंशिक फेज -1 व्यापार व्यवबारावर पोहोचण्यापूर्वी ट्रम्प यांनी चीनसोबत एक उच्च व्यापार युद्ध केलं होतं.

ट्रम्प यांनी फेज-2 मध्ये चर्चा करण्यापूर्वी सांगितले की चीनसाठी दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तर बीजिंगने दिलेल्या कोरोनाशी लढण्याच्या उपयांनी ते नाखूश आहेत. जूनमध्ये अमेरिकेच्या ट्रेजरी सेक्रेटरी स्टीवन मेन्युचिनने सांगितले की अमेरिका आणि चीन अर्थव्यवस्थेमधून वेगळे होण्याचा परिणाम असा होईल की अमेरिका कंपन्यांना चीनच्या अर्थव्यवस्थेत योग्य आणि स्तरीय आधारावर प्रतिस्पर्धा करण्याची अनुमती असणार नाही.

टिकटॉक डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दाखल करणार खटला

अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) द्वारा लावलेल्या बंदीविरोधात चीनचा व्हिडीओ अॅप टिकटॉक (TikTok) कायदेशीर कारवाई (Legal Action Against Trump) करण्याची तयारी करीत आहे.  ट्रम्पचे एग्जिक्यूटिव्ह ऑर्डरच्या अनुसार टिकटॉक अॅपच्या मदर कंपनी बाइटडांसवर अमेरिकेत सप्टेंबरच्या मध्यापर्यंत व्यापारावर पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात येईल.

Published by: Meenal Gangurde
First published: August 23, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या