'बाय अमेरिका, हायर अमेरिका'वर ट्रम्प यांची मोहोर

भारतीय आयटी कंपन्यांना ट्रम्प यांचा दणका

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2017 12:08 PM IST

'बाय अमेरिका, हायर अमेरिका'वर ट्रम्प यांची मोहोर

19 एप्रिल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयटी कंपन्यांना जोरदार दणका देत 'बाय अमेरिकन...हायर अमेरिकन' या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. हा अध्यादेश लागू झाल्याने आता अमेरिकेत आयटी कंपन्यांना नोकरी देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य द्यावं लागणार आहे. नवीन धोरणानुसार जास्त वेतन असलेल्या आणि कुशल कर्मचाऱ्यांनाच अमेरिकेतील एच 1 बी व्हिसा दिला जाणार आहे. भारतातील आयटी तज्ज्ञांमध्ये अमेरिकेतील एच 1बी व्हिसा प्रसिद्ध आहे.

ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात एच 1 बी व्हिसा नियमात बदल करुन अमेरिकन तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी या व्हिसा नियमात बदल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. मंगळवारी ट्रम्प यांनी 'बाय अमेरिकन हायर अमेरिकन' या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. एच 1 बी व्हिसामुळे अमेरिकेतील तरुणांकडून रोजगार हिरावला जातो. बाहेरील देशांमधील तरुणांना कमी वेतनात अमेरिकेत नोकरी दिली जाते. व्हिसाच्या या गैरवापरावर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

आता फक्त जास्त वेतन असलेल्या आणि कुशल कर्मचाऱ्यांनाच हा व्हिसा मिळू शकेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे नवीन इमिग्रेशन प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अमेरिकेत दरवर्षी सुमारे 85 हजार परदेशी नागरिकांना एच१ बी व्हिसा दिला जायचा. यात भारतातील आयटी क्षेत्रातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2018 या वर्षांत 65,000 एच १ बी व्हिसासाठी जवळपास 2 लाख अर्ज आले आहेत.  त्याचबरोबर, एच 1 बी व्हिसासाठी नेहमीची सोडत पद्धतही बाजूला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियापाठोपाठ अमेरिकेच्या निर्णयाने भारताला मोठा फटका बसला आहे.

Loading...

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...