ट्रम्प यांच्यासोबतचा 'सेल्फी' पडला महागात !

ट्रम्प यांच्यासोबतचा 'सेल्फी' पडला महागात !

अमेरिकेतील एका चिअर्स गर्ल्सला राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा सेल्फी चांगलाच महागात पडलाय. याच सेल्फीचं कारण पुढे करत तिच्या वकील नवऱ्याने तिला थेट घटस्फोटच देऊन टाकलाय.

  • Share this:

न्यूयॉर्क,1 ऑगस्ट : अमेरिकेतील एका चिअर्स गर्ल्सला राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा सेल्फी चांगलाच महागात पडलाय. याच सेल्फीचं कारण पुढे करत तिच्या वकील नवऱ्याने तिला थेट घटस्फोटच देऊन टाकलाय. लिन एरोनबर्ग असं या महिलेचं नाव असून ती रिपब्लिकन पक्षाची पाठिराखी आहे तर तिचा नवरा डेव एरोनबर्ग हा डेमोक्रॅटिक पक्षाचा सपोर्टर आहे. सोशल मीडियावर या 'ट्रम्प' घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, यासंदर्भात लिन हिने मात्र, डेव यांना मुलं नको होती म्हणूनच त्यांनी मला घटस्फोट दिल्याचं म्हटलंय, तर या घटस्फोटाशी संबंधीत एका पीआर फर्मने त्यांच्या प्रेसनोटमध्ये त्याचं वर्णन चक्क 'ट्रम्प घटस्फोट' असं केलंय.

ट्रम्प यांच्यासोबतची छायाचित्रं मी सोशल मीडियावर टाकू नयेत. अशी मागणी पती डेव यांच्याकडून होत होती पण त्याला नकार दिल्यानेच त्यांनी मला घटस्फोट दिल्याचंही लिन म्हणते. आम्ही दोघेही परस्परविरोधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने आमच्यात यावरूनच अनेकदा खटकेही उडत होते. असंही लिनने म्हटलंय. आम्ही घटस्फोट घेतला असला तरी आमच्यात यापुढेही चांगली मैत्री राहिल असंही लिन म्हणते. या घटस्फोटासाठी लिन हिला तिचा पती डेव याच्याकडून एक लाख डॉलरची पोटगीही मिळाली आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या सेल्फीनंतर लिन हिने ज्युनिअर ट्रम्प म्हणजेच त्यांच्या मुलासोबत डिनरला जाण्याचा प्लॅनही बनवलाय.

(न्यूज 18)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 05:19 PM IST

ताज्या बातम्या